लैंगिक जीवन : कार असणारे लोक आणि शारीरिक संबंधाचं 'हे' हॉट कनेक्शन वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 02:58 PM2020-01-03T14:58:11+5:302020-01-03T15:50:11+5:30

तुम्हाला जर कार आणि सेक्शुअल लाइफ यात मोठा संबंध असल्याचं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?

Sex Life: New study says that owning a car at young age means more sex for millennials | लैंगिक जीवन : कार असणारे लोक आणि शारीरिक संबंधाचं 'हे' हॉट कनेक्शन वाचून व्हाल अवाक्...

लैंगिक जीवन : कार असणारे लोक आणि शारीरिक संबंधाचं 'हे' हॉट कनेक्शन वाचून व्हाल अवाक्...

googlenewsNext

तुम्हाला जर कार आणि सेक्शुअल लाइफ यात मोठा संबंध असल्याचं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? बहुतेक लोक नाही म्हणतील. पण नुकत्याच एका रिसर्चमधून समोर आले आहे की, कार आणि सेक्सचं फारच हॉट कनेक्शन आहे. या रिसर्चनुसार, जर कुणी कमी वयातच कार खरेदी करतं तेव्हा त्या व्यक्तीचा स्वाभिमान वाढतो. 

कार आणि सेक्सचा संबंध

कार त्याच्यासाठी स्टेटस सिम्बॉल बनते आणि हीच बाब महिलांना देखील आकर्षित करते. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, कमी वयातच कार घेणाऱ्यांची सेक्शुअल इच्छा आणि सेक्स करण्याची शक्यता दोन्ही वाढतात. हा रिसर्च मेक्सिकोमध्ये करण्यात आला. पण भारतातील कमी वयात कार घेणाऱ्यांवर ही बाब किती लागू पडते, हे तर त्यांनाच माहीत असेल.

म्हणून हे असं होतं...

मेक्सिकोच्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलिमाच्या अभ्यासकांनी केलेल्या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, कार असल्याने एका व्यक्तीची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा आणि शारीरिक संबंध ठेवण्याची शक्यता दोन्ही वाढते. या रिसर्चचे मुख्य लेखक डेविड हनॅनडेज सांगतात की, 'जीवनाच्या सुरूवातीच्या दिवसातच कारचं मालक होणं, सेक्शुअल डिजायर वाढवण्याचं काम करतं. काही महिला अशा पुरूषांना महत्व देतात ज्यांच्याकडे मटेरिअल रिसोर्स अधिक असतात आणि कार त्यापैकीच एक आहे. 

विद्यार्थ्यांसोबत केला रिसर्च

Experts says women notice these 5 things in partner during intimate relation | लैंगिक जीवन :

Sexuality Research And Social Policy नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चसाठी अभ्यासकांनी वेस्टर्न मेक्सिकोच्या एका युनिव्हर्सिटीतील १७ ते २४ वयोगटातील ८०९ विद्यार्थ्यांना त्यांच्या सेक्सलाईफबाबत प्रश्न विचारले. यादरम्यान त्यांना त्यांचे सेक्शुअल व्यवहारासोबतच सामाजिक आणि आर्थिक बाबीही जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना दोन गटात विभागण्यात आलं. एक ज्यांच्याकडे कार होती तर दुसरा ज्यांच्याकडे कार नव्हती.

काय आला निष्कर्ष?

Experiencing low sex drive improve it naturally | लैंगिक जीवन :

या रिसर्चमधून समोर आले की, कमी वयात कार खरेदी करणाऱ्या किंवा कार वापरणाऱ्यांमध्ये कामेच्छा अधिक होती. कमी वयातच शारीरिक संबंध ठेवण्याची त्यांची शक्यता अधिक होती. त्यांचे जास्त सेक्शुअल पार्टनर्स होते आणि सेक्शुअल अॅक्टची फ्रीक्वेंसीही अधिक होती. ज्या लोकांकडे कार होती त्यांनी दुप्पट शारीरिक संबंध ठेवले आणि त्यांचे सेक्शुअल पार्टनरही जास्त होते. ज्यांच्याकडे कार नव्हती त्यांच्यात हे प्रमाण कमी होतं. 


Web Title: Sex Life: New study says that owning a car at young age means more sex for millennials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.