लैंगिक जीवन : काय आहे Sensate Focus आणि काय होतो याचा फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 03:01 PM2019-11-11T15:01:29+5:302019-11-11T15:03:43+5:30
तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या विचित्र सेक्स ट्रेन्ड्सबाबत ऐकलं असेलच. इतकेच काय तर शारीरिक संबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पोजिशनबाबतही तुम्ही ऐकलं असेल.
तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या विचित्र सेक्स ट्रेन्ड्सबाबत ऐकलं असेलच. इतकेच काय तर शारीरिक संबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पोजिशनबाबतही तुम्ही ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका थेरपीबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत तुम्ही कदाचित काही ऐकलं नसेल. या थेरपीच्या माध्यमातून एक वेगळाच सेक्शुअल प्लेजर मिळतो आणि तोही पेनिस्ट्रेशनशिवाय.
कुणी केला होता आविष्कार?
या सेक्स थेरपीचं नाव आहे Sensate Focus. या थेरपीचा आविष्कार मानवी सेक्शुअल रिस्पॉन्सवर रिसर्च करणारे दोन व्यक्ती म्हणजे विलियम एच मास्टर्स आणि व्हर्जिनिया ई जॉनसन यांनी १९६० च्या दशकात केला होता.
काय असतं यात?
या थेरपीमध्ये पेनिस्ट्रेशन किंवा इंटरकोर्स नसतो. यात काही एक्सरसाईज केल्या जातात, ज्या कपल्स घरीच करू शकतात. या थेरपी दरम्यान दोन्ही पार्टनर न्यूड असतात आणि एक्सरसाइज दरम्यान दोघेही एकमेकांच्या वेगवेगळ्या संवेदनशील अवयवांना स्पर्श करतात. पण यादरम्यान इच्छा असूनही कुणी सेक्शुअल इंटरकोर्स करायचं नसतं.
कशावर केला जातो फोकस?
या थेरपीमध्ये दोन्ही पार्टनर्सना स्पष्टपणे सांगितलं जातं की, त्यांनी परफॉर्मन्स किंवा ऑर्गॅज्मऐवजी आपल्या अनुभवांवर फोकस करा. या प्रक्रियेदरम्यान एकमेकांच्या अवयवांना स्पर्श करून जे जाणवतं त्यावर फोकस करा.
तीन स्टेजमध्ये असते ही थेरपी
Sensate Focus ही थेरपी तीन स्टेजमध्ये केली जाते. पहिल्या स्टेजमध्ये यात दोघेही एकमेकांच्या वेगवेगळ्या संवेदनशील अवयवांना स्पर्श करतात. याचा उद्देश हा असतो की, त्यांनी एकमेकांना फील करावं. यात कपल्स स्पर्श करणे, किस करणे तुम्ही करू शकता. तसेच बोलू शकता किंवा एकमेकांना मिठी मारू शकता. पण ते ना स्तनांना स्पर्श करू शकत, ना एकमेकांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करू शकत.
दुसरी स्टेज
दुसऱ्या स्टेजमध्ये कपल्सना केवळ स्तनांना स्पर्श करण्याची सूट असते. याचाही हा उद्देश असतो की, दोघांनी एकमेकांचं शरीर समजावं आणि ते फील व्हावं. यानंतर एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरच्या हातावर हात ठेवून हे व्यक्त करतात की, कोणतंही परफॉर्मन्स प्रेशर नसताना त्यांना एकमेकांच्या शरीरात काय चांगलं वाटतं.
तिसरी स्टेज
तिसऱ्या स्टेजध्ये पार्टनर्स एकमेकांच्या प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श करू शकतात. आणि इंटरकोर्सही करू शकतात. पण तरी सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेत ऑर्गॅज्म हा मुख्य लक्ष्य नसतो.