लैंगिक जीवन : फ्लेवर्ड कंडोमचा वापर करावा की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 03:25 PM2019-11-20T15:25:30+5:302019-11-20T15:25:37+5:30
जेव्हा विषय सेक्शुअल हेल्थचा येतो तेव्हा जास्तीत जास्त लोक यावर काही बोलण्यास टाळतात किंवा त्यांची बोलती बंद होते.
जेव्हा विषय सेक्शुअल हेल्थचा येतो तेव्हा जास्तीत जास्त लोक यावर काही बोलण्यास टाळतात किंवा त्यांची बोलती बंद होते. पण आता ही वेळ आली आहे की, तुम्ही आणि तुमच्या पार्टनरने असुरक्षित शारीरिक संबंधामुळे होणाऱ्या जीवघेण्या आजारांबाबत माहिती मिळवावी. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, बाजारात मिळणारे फ्लेवर्ड कंडोम किती सुरक्षित असतात किंवा त्यांचा वापर करावा की नाही याबाबत...
...म्हणून झाली होती सुरूवात
सेक्शुअल प्लेजर वाढवण्यासाठी फ्लेवर्ड कंडोमची सुरूवात झाली. नॉर्मल कंडोमचा फ्लेवर रबरसारखा असतो. त्यामुळे मोठ्या संख्येने कपल्स ओरल सेक्स करू शकत नव्हते. त्यामुळेच फ्लेवर्ड कंडोमची सुरूवात केली गेली, जेणेकरून कपल्सना ओरल सेक्सचा आनंद घेता यावा.
महिलांना होतं नुकसान
मेन्स एक्सपी डॉट कॉम या वेबसाइटला न्यूरोलॉजिस्ट डॉ. रमन तंवर यांनी सांगितले की, 'पुरूषांना फ्लेवर्ड कंडोमपासून काहीही नुकसान होत नाही. मात्र, महिला जोडीदाराच्या प्रायव्हेटमध्ये याने नुकसान होऊ शकतं.
काय होऊ शकते समस्या?
त्यांनी सांगितले की, फ्लेवर्ड कंडोममुळे महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खाज, जळजळ, ड्रायनेस किंवा लुब्रिकन्टची कमतरता अशा समस्या होऊ शकतात. याने व्हजायनाच्या पीएच लेव्हलमध्ये गडबड होऊ शकते. सोबतच फ्लेवर्ड कंडोममध्ये शुगरचं प्रमाणही असतं, जे व्हजायनासाठी चांगलं नसतं.
उपाय काय कराल?
डॉक्टर म्हणाले की, फ्लेवर्ड कंडोमबाबत फार भितीही वाटून घेण्याची गरज नाही. जर तुम्ही स्वस्त फ्लेवर्ड कंडोमचा वापर करत असाल तर याने अर्थातच नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे चांगल्या ब्रॅन्डच्या फ्लेवर्ड कंडोमचा वापर करू शकता. यांनी त्वचेला कमीत कमी नुकसान होतं.