लैंगिक जीवन : टेस्टोस्टेरॉनबाबत तुम्हाला 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 04:32 PM2019-09-03T16:32:07+5:302019-09-03T16:34:39+5:30
टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन शरीरातील सर्वात महत्वपूर्ण हार्मोन मानला जातो. मसल्स मांस, बोन डेंसिटी आणि कामेच्छा कायम ठेवण्यासाठी हा हार्मोन महत्वपूर्ण भूमिका निभावतो.
टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन शरीरातील सर्वात महत्वपूर्ण हार्मोन मानला जातो. मसल्स मांस, बोन डेंसिटी आणि कामेच्छा कायम ठेवण्यासाठी हा हार्मोन महत्वपूर्ण भूमिका निभावतो. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण शरीरात संतुलित ठेवणं अनिवार्य ठरतं. या हार्मोन्सचं शरीरातील संतुलन बिघडलं तर इन्फर्टिलिटी, नपुंसकता आणि कमजोरी या समस्या होतात. त्यासोबतच टेस्टोस्टेरॉन सेक्स ड्राइव्हशी संबंधित आहे आणि शुक्राणु उत्पादनातही महत्वाची भूमिका बजावतो. जेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉनची योग्य प्रमाणात निर्मिती होत नाही त्या स्थितीला हायपोगोनॅडिज्म असं म्हणतात. चला जाणून घेऊ टेस्टोस्टेरॉनबाबत आणखी काही गोष्टी....
अधिक पैसे किंवा अधिक आनंद
असं मानलं जातं की, जेव्हा पुरूषाकडे अधिक पैसा येतो किंवा एखाद्या विजयाचा आनंद होतो तेव्हा त्या व्यक्तीतील टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण वाढतं. त्यासोबतच पॉर्न बघितल्यावरही पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं.
भाज्या खा
हे एक प्रसिद्ध तथ्य आहे की, आहार संपूर्ण आरोग्यावर फार मोठा प्रभाव करतो. मजेदार बाब अशीही सांगितली जाते की, जे लोक शाकाहारी असतात, त्यांच्यात मांसाहारी पुरूषांच्या तुलनेत अधिक टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण असतं.
मूड स्वींग्स
टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी झालं तर हे मूड स्वींगचं कारण ठरू शकतं. तसेच याने बोन डेंसिटी आणि मसल्स मांसमध्येही घट होते. तसेच शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी झालं तर सेक्स ड्राइव्हही कमी होते आणि वेळेआधीच वय वाढल्याची लक्षणे दिसू लागतात.
कोणतंही ठराविक वय नसतं
असं अजिबात नाहीये की, वृद्ध पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी असतं. मात्र, सत्य हेही आहे की, कोणत्याही वयाच्या पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होऊ शकतं. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होण्याची मुख्य कारणे स्लीप एपनिया, डायबिटीस ही सांगितली जातात.