लैंगिक जीवन : भारताच्या 'या' शहरातील लोक ऑफिसमध्येच 'कार्यक्रम' करण्यात सर्वात पुढे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 03:13 PM2019-11-13T15:13:17+5:302019-11-13T15:17:32+5:30
शारीरिक संबंधाबाबत आजही लोक संकुचितपणे बोलताना दिसतात. आजही दबक्या आवाजात या गोष्टी काही लोक बोलतात. पण तरीही आधीपेक्षा ही मानसिकता जरा बदलत आहे.
शारीरिक संबंधाबाबत आजही लोक संकुचितपणे बोलताना दिसतात. आजही दबक्या आवाजात या गोष्टी काही लोक बोलतात. पण तरीही आधीपेक्षा ही मानसिकता जरा बदलत आहे. भारतातील लोकांची शारीरिक संबंधाबाबतची ही बदलती मानसिकता एका सर्व्हेतून समोर आली आहे. इंडिया टुडेने केलेल्या एका सर्व्हेत भारतातील लोकांना त्यांचे शारीरिक संबंधाबाबतचे विचार विचारण्यात आले आहेत. यातून समोर आले की, लोक ऑफिसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यातही पुढे आहेत.
दिल्लीचे लोक पुढे...
(Image Credit : bigthink.com)
या सर्व्हेमधे लोकांना विचारण्यात आले की, त्यांनी कधी ऑफिसमध्ये शारीरिक संबंध ठेवले का? या प्रश्नावर सर्वात जास्त म्हणजे २८ टक्के दिल्लीवाल्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. याचा अर्थ असा होतो की, ऑफिस परिसरात शारीरिक संबंध ठेवण्यात दिल्लीवालने सर्वात पुढे आहेत.
रांचीमध्ये काय स्थिती?
दिल्लीनंतर याबाबतीत एखाद्या मेट्रो शहराचा नाही तर रांचीसारख्या छोट्या शहराचा नंबर लागतो. येथील १९.५ टक्के लोकांनी ऑफिसमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रश्नावर होकारार्थी उत्तर दिले.
नोएडा-गुडगावमधील १०० टक्के लोकांचं उत्तर होतं 'हे'
ऑफिसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याच्या प्रश्नावर दिल्लीतील २८ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिलं. तेच दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडा आणि गुडगावच्या १०० टक्के लोकांनी या प्रश्नावर नकारार्थी उत्तर दिलं. म्हणजे त्यांनी ऑफिसमध्ये कधीच शारीरिक संबंध ठेवले नाही. त्यासोबतच इंदोर, कोलकाता आणि चंडीगढच्या लोकांनीही ऑफिसमध्ये शारीरिक संबंधाच्या प्रश्नावर 'नाही' असं उत्तर दिलं.
तसेच लोकांना असेही विचारण्यात आले की, ते ऑफिसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याबाबत विचार करतात का? यावर लखनौच्या ४८ टक्के, चेन्नईतील ४२ आणि गुरूग्रामच्या ४३ लोकांनी 'हो' असं उत्तर दिलं.