लैंगिक जीवन : ऐनवेळेला 'या' चुका कराल तर रात्रभर फक्त तारे मोजत बसावं लागेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 04:05 PM2019-11-06T16:05:01+5:302019-11-06T16:09:11+5:30
समजा पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना ऐन उत्साहात जर असं काही घडलं की, ज्याने पार्टनरची उत्तेजना किंवा तुमची उत्तेजना कमी होईल, तर यापेक्षा वाईट दुसरं काही होऊच शकत नाही.
(Image Credit : whitsundayprofessionalcounselling.com)
समजा पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना ऐन उत्साहात जर असं काही घडलं की, ज्याने पार्टनरची उत्तेजना किंवा तुमची उत्तेजना कमी होईल, तर यापेक्षा वाईट दुसरं काही होऊच शकत नाही. मुळात शारीरिक संबंधावेळी काय करावं हे सर्वांनाच माहीत असतं, पण काय करू नये हे अनेकांना माहीत नसतं. म्हणजे यावेळी काही चुका करणं टाळलं पाहिजे, नाही तर तुमचे हे परमोच्च आनंद देणारे क्षण तुमच्यापासून दूर जातील. चला जाणून घेऊ काय चुका करू नये.
पार्टनर सज्ज होण्यापूर्वीच लव्ह बाइट देणे
(Image Credit : Social Media)
तसा तर पार्टनरला लव्ह बाइट देणे हा त्यांची उत्तेजना वाढवण्याचा सर्वात चांगला पर्याय असू शकतो. पण पार्टनर पूर्णपणे सज्ज नसेल आणि तुम्ही त्यांना सिग्नल न देताच शरीराच्या एखाद्या भागावर चावाल तर कदाचित याने त्यांना त्रास होऊ शकतो. आता अचानक झालेल्या या गोष्टीमुळे त्यांचा मूड पूर्णपणे कोमात जाऊ शकतो. अशावेळी घाई न करता पार्टनरला आधी उत्तेजित आणि तयार होऊ द्या, त्यानंतर लव्ह बाइट द्या.
पार्टनरवर तुमच्या वजनाचा पूर्ण भार देणे
तुम्ही महिला असाल आणि जर पार्टनरसोबत विमेन ऑन टॉप पोजिशनमध्ये असाल तर पार्टनरवर तुमच्या शरीराचं वजन टाकतेवेळी सावधानता बाळगावी. तुमच्या शरीराच्या वजनाने पार्टनरला दबल्यासारखं वाटू शकतं किंवा श्वास घेण्यासही अडचण येऊ शकते. असं झालं तर संबंधाची मजा तर जाईल सोबतच पुन्हा असं करण्याचा इंटरेस्टही कमी होईल. हीच बाब पुरूषांनाही लागू पडते.
फार लवकर किंवा उशीराने क्लायमॅक्स
हे खासकरून पुरूषांसाठी आहे. पुरूषांचा त्यांच्या मसल्स म्हणजे मांसपेशींवर पूर्ण कंट्रोल असला पाहिजे. जेणेकरून ते योग्यवेळी इजॅक्युलेट करू शकतील. जर तुम्ही योग्य वेळेआधीच इजॅक्युलेट केलं तर तुमच्या पार्टनरला संतुष्टी मिळणार नाही आणि जर तुम्हाला इजॅक्युलेट करायला जास्त वेळ लागला तर पार्टनरला वाटेल की, ती जिममध्ये घाम गाळत आहे. त्यामुळे योग्य वेळेवर क्लायमॅक्स करणं फार गरजेचं आहे.
पॉर्नसारखं करण्याचा विचार करू नका
तशी तर अनेक लोकांना raunchy म्हणजेच कामोत्तेजक शारीरिक संबंधाची इच्छा असते. पण असं काही करण्याआधी पार्टनरची सहमती असणं फार गरजेचं आहे. दोघांपैकी एकही पार्टनर यासाठी तयार नसेल तर दोघांनाही आनंद मिळणार नाही. तसेच पॉर्न सिनेमात बघता त्याप्रमाणेच काही करण्याचा अट्टाहास बरा नव्हे. कारण ते सगळं स्क्रीप्टेड असतं.
पार्टनरची ऐनवेळेला एक्ससोबत तुलना करणे
कोणत्याही व्यक्तीचं मूड खराब होण्यासाठी यापेक्षा मोठं कारण असूच शकत नाही की, पार्टनर संबंध ठेवत असताना दुसऱ्या पार्टनरची तुलना एक्ससोबत करत असेल. एक्स पार्टनरसोबत तुमचा सेक्शुअल अनुभव कितीही चांगला का राहिला असेना, सध्याच्या पार्टनरसोबत ऐनवेळेला का तो विषय काढायचा? झालं गेलं विसरून आता असलेल्या पार्टनरकडे लक्ष द्यायला पाहिजे.