लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 16:52 IST2021-02-12T16:50:27+5:302021-02-12T16:52:22+5:30
Sexual Health : काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, पॉर्न सिनेमे पाहिल्याने सेक्शुअल अॅक्टिविटीदरम्यान इरेक्शन योग्यप्रकारे होऊ शकत नाही.

लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!
Sexual Health : पॉर्न बघून लोकांना फॅंटसीज पूर्ण करण्यास मदत मिळते. खासकरून जे लोक त्यांचं लैंगिक जीवन (Sex life) एन्जॉय करू शकत नाहीत त्यांच्यासाठी काही प्रमाणात पॉर्न आधारही सिद्ध होऊ शकतो. पण फार जास्त पॉर्न बघण्याने काही नुकसानही होतात. त्यातील एक मोठं नुकसान म्हणजे इरेक्टाइल डिस्फंक्शनची (Erectile Disfunction) समस्या.
काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, पॉर्न सिनेमे पाहिल्याने सेक्शुअल अॅक्टिविटीदरम्यान इरेक्शन योग्यप्रकारे होऊ शकत नाही. अशाप्रकारे पॉर्नचा तुमच्या लैंगिक जीवनावर वाइट प्रभाव पडतो. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : स्वप्नात शारीरिक संबंध ठेवण्याचे 'खास' अर्थ, वाचून पडाल विचारात....)
एक्सपर्ट सांगतात की, पॉर्न बघणे आणि इरेक्टाइल डिस्फंक्शन यांच्यात थेट संबंध बघितला गेला नाही. याचा प्रभाव तसाच पडतो जसा हस्तमैथुनामुळे होतो. जर एखादी व्यक्ती पॉर्न सिनेमा पाहिल्यावर हस्तमैथुन करत असेल तेव्हा ज्या फ्रिक्शन आणि प्रेशरने ही अॅक्टिविटी होते तशी शारीरिक संबंधावेळी होत नाही. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी इरेक्टाइल डिस्फंक्शनची आणि ऑर्गॅज्म मिळवण्याची समस्या होते. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शीघ्रपतन नेमकं कशामुळे होतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय...)
जे लोक पॉर्न बघतात आणि पुन्हा पुन्हा काही खास पद्धतीने हस्तमैथुन केल्याने ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचतात. तेव्हा त्यांना उत्तेजित होण्यासाठी याच पद्धतीची सवय लागते. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी त्यांना उत्तेजित होण्यास अडचण निर्माण होते. इतकेच नाही तर पॉर्नोग्राफी बघणारे लोक शारीरिक संबंधाबाबत अवास्तववादी अपेक्षा करू लागतात. ते पॉर्नमधील गोष्टींना खरं मानून त्यावर विश्वास ठेवत असतील तर याने त्यांना परफॉर्मन्स एंग्जायटीसारखी समस्या होऊ लागते. यानेच इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होऊ शकते.
जर तुम्हाला वाटत असेल की, पॉर्न बघण्याची सवय तुमच्या सेक्शुअल अॅक्टिविटीवर प्रभाव करत आहे. तर वेळीच यूरोलॉजिस्टची भेट घ्या. जेणेकरून वेळीच योग्य ते उपाय करता येतील. आणि तुम्हाला ही समस्या का आहे याचंही खरं जाणून घेता येईल. याने तुम्हाला इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमच्योर इजॅक्यूलेशन साखऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळेल.