लैंगिक जीवन : ऐनवेळी ताठरता कमी होते? जाणून घ्या कारणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 03:17 PM2019-11-29T15:17:12+5:302019-11-29T15:35:14+5:30
सेक्शुअल हेल्थच्या एका सर्व्हेत ३७ टक्के लोकांनी हे मान्य केलं की, शारीरिक संबंधावेळी कंडोम वापरताना त्यांना इरेक्शनची कमतरता जाणवते.
(Image Credit : psychologytoday.com)
कंडोममुळे इरेक्शन(ताठरता) कमी होत असेल तर ही समस्या होणारे तुम्ही एकटे नाहीत. कंडोम वापरताना इरेक्शन नसणं ही एक कॉमन समस्या आहे. सेक्शुअल हेल्थच्या एका सर्व्हेत ३७ टक्के लोकांनी हे मान्य केलं की, शारीरिक संबंधावेळी कंडोम वापरताना त्यांना इरेक्शनची कमतरता जाणवते. पण असं का होतं आणि कंडोममुळे आनंद कमी होतो का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ..
काय होतं असं?
इरेक्शन कमी होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. ज्यात कंडोम हेही एक कारण आहे. कारण कंडोम लावण्यासाठी ब्रेक थोडासाच घेतला जात असला तरी याने तुमचा उत्साह कमी होऊ इरेक्शनही कमी होऊ शकतं. यावेळी इरेक्शन आणि उत्तेजना कमी होऊ नये म्हणून तुम्ही दोघेही काहीतरी करत राहण्याचा प्रयत्न करू शकता. जेणेकरून उत्तेजना कमी होणार नाही.
योग्य साइजचा कंडोम
इरेक्शन कमी होण्याचं दुसरं कारण हे असू शकतं की, तुम्ही योग्य साइजच्या कंडोमची निवड केली नसावी. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या साइजचे कंडोम उपलब्ध असतात. अशात तुम्ही योग्य साइजच्या कंडोमची निवड करणं गरजेचं आहे. जेणेकरून कंडोम व्यवस्थित फिट व्हावा. साइज योग्य नसेल तर इरेक्शन कमी होऊ शकते.
सेन्सेशनमध्ये कमतरता
तुम्ही हे नोटीस केलं असेल की व्हजायनल स्टिम्युलेशनने पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टला तेव्हांच जास्त उत्तेजना वाटते जेव्हा प्रोटेक्शनचा वापर करत नाही. इंटरकोर्सवेळी लेटेक्सच्या लेअरमुळे स्टिम्युलेशन कमी होऊ शकतं. यासाठी तुम्ही पातळ कंडोमचा वापर करू शकता.
या कारणानेही कमी होऊ शकतं इरेक्शन
इरेक्शन कमी असण्याची कारणे तणाव आणि चिंता ही सुद्धा असू शकतात. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुमच्यावर याचा जास्त काळासाठी प्रभाव राहतो. ज्या लोकांवर डिप्रेशनचे उपचार सुरू आहेत त्यांनाही इरेक्शन आणि कामेच्छा कमी होण्याची समस्या होऊ शकते. यावर उपचारासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.