लैंगिक जीवन : हस्तमैथुन केल्यावर लघवी करताना वेदना किंवा त्रास का होतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 02:23 PM2020-01-14T14:23:31+5:302020-01-14T14:25:41+5:30
अनेक पुरूषांसोबतच अनेक महिला सुद्धा हस्तमैथुन करतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. पण अनेकांना हस्तमैथुन केल्यावर लघवी करताना जळजळ होते.
अनेक पुरूषांसोबतच अनेक महिला सुद्धा हस्तमैथुन करतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. पण अनेकांना हस्तमैथुन केल्यावर लघवी करताना जळजळ होते. अनेकदा तर काही महिला अशीही तक्रार करतात की, दोन दिवस त्यांनी हस्तमैथुन न केल्यास त्यांना लघवी करताना त्रास होतो. असं झालं की, अनेकांच्या मनात भिती निर्माण होते. वेगवेगळ्या प्रश्न त्यांच्या मनात तयार होतात. पण याबाबत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊ....
काय असू शकतं कारण?
तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही रोज हस्तमैथुन करत असाल तर अनेकदा पूर्णपणे सीमेन बाहेर नाही निघू शकत. जे सीमेन आत शिल्लक राहतं ते झोपताना डिस्चार्ज होतं. जेव्हा तुम्ही सेक्शुअली कमी एक्साइट असाल तेव्हा हस्तमैथुन कराल तर ही समस्या अधिक होते.
जर हस्तमैथुन न केल्यामुळे लघवी करताना जळजळ होत असेल तर वेळीच एखाद्या डॉक्टरलाही समस्या सांगा. ही समस्या कमी पाण्यामुळेही होऊ शकते. यासाठी भरपूर प्रमाणात पाणी आणि तरल पदार्थांचं सेवन करा. अनेकदा हस्तमैथुन किंवा शारीरिक संबंधाच्या चुकीच्या पद्धतीमुळेही लघवी करताना ही समस्या होऊ शकते.
हस्तमैथुनाबाबत खास बाब
भारतात तरी हस्तमैथुनासाठी महिन्यातील एक ठराविक दिवस सेलिब्रेट केला जात नाही. पण पाश्चिमात्य देशांमध्ये याला कायदेशीर मान्यता आहे. सगळेच त्यांच्या हस्तमैथुनाच्या अधिकाराचा उत्सव साजरा करतात.
सगळे पुरूष - महिला करत नाही हस्तमैथुन
हे अगदी बरोबर आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, केवळ ५७ टक्के लोकच नियमितपणे हस्तमैथुन करतात. याचं कारण पसंत-नापसंतही असू शकतं. काही रिसर्चमधून तर असंही समोर आलं आहे की, जे लोक हस्तमैथुन करतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
अनेकांना असंच वाटत असतं की, हस्तमैथुन करणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. पण हा विचार साफ चुकीचा आहे. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालंय आणि अनेक तज्ज्ञही सांगतात की, ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यात काहीच गैर नाही. पण अति करू नये.