लैंगिक जीवन : महिलांनी 'ही' समस्या वेळीच दूर केली तर मिळेल दुप्पट आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 03:42 PM2019-11-12T15:42:12+5:302019-11-12T15:50:34+5:30
अनेकदा पार्टनरसोबत बऱ्याच वर्षांपासून राहत असतानाही पहिल्यांदा किंवा नंतरही त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भिती वाटते.
(Image Credit : businessinsider.com)
अनेकदा पार्टनरसोबत बऱ्याच वर्षांपासून राहत असतानाही पहिल्यांदा किंवा नंतरही त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भिती वाटते. याबाबत एखादी भिती असेल तर ही एक सामान्य बाब आहे. याला सेक्स एंग्जायटी म्हटलं जातं. ही समस्या महिला आणि पुरूष दोघांनाही होऊ शकते. तुम्ही शारीरिक संबंध ठेवले असले तरी तुम्हाला असहजता वाटू शकते. चला जाणून घेऊ काय आहे सेक्स एंग्जायटी आणि ही समस्या दूर करण्याचे उपाय....
काय आहे ही समस्या?
(Image Credit : sbs.com.au)
सेक्स एंग्जायटी एकप्रकारची भिती आहे, ज्यात तुम्हाला वाटतं की, तुमचा एखादा अयवय पार्टनरला आकर्षक वाटणार नाही किंवा तुम्हाला हा संशय असतो की, तुम्ही पार्टनरला संतुष्ट करू शकणार नाहीत. तुम्हाला शारीरिक संबंधाचा अनुभव असेल किंवा नसेल तरी सुद्धा ही भिती वाटू शकते. काही लोकांमध्ये ही भिती अनेक दिवस राहते.
महिलांमध्ये अधिक असते ही समस्या
(Image Credit : yourtango.com)
रिपोर्ट्सनुसार महिलांमध्ये सेक्स एंग्जायटी अधिक असते. या एंग्जायटीमुळे शारीरिक संबंधातील रस कमी होणे आणि ऑर्गॅज्ममध्ये समस्या येऊ शकते.
स्वत:च्या शरीरावर करा प्रेम
तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला हे वाटलं पाहिजे की, तुमच्या शरीरापेक्षा महत्वाचं काहीच नाहीये.
एक्सरसाइज आणि मेडिटेशन
(Image Credit : diettogo.com)
एक्सरसाइज केल्याने हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात. सोबतच मेडिटेशन करूनही तुम्ही सेक्स एंग्जायटीला दूर करू शकता. याने तुमच्यात सकारात्मक विचार येतात आणि तुमच्या मनातील भिती दूर होण्यास मदत मिळते.
गरजा समजून घ्या
(Image Credit : evoke.ie)
महिलांची सेक्शुअल डिजायर फार कॉम्प्लिकेटेड असते. अशात गरजेचं आहे की, तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की, तुम्हाला बेडमध्ये काय हवंय. त्यानंतर तुम्ही तेच तुमच्या पार्टनरला समजावून सांगितलं पाहिजे. महिलांना ऑर्गॅज्म उशिराने होतो, त्यामुळे आपल्या डिजायरबाबत पार्टनरसोबत बोलावं.