लैंगिक जीवन : 'या' वयात महिलांमध्ये ८ पटीने वाढते कामेच्छा, त्यांनीच दिली उत्तरे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 04:05 PM2019-12-13T16:05:23+5:302019-12-13T16:08:13+5:30
महिला आणि पुरूषांची लैंगिक क्षमता वेगवेगळी असते. तशी तर महिलांमध्ये नेहमीच शारीरिक संबंधाची इच्छा अधिक असते.
(Image Credit : hellogiggles.com)
महिला आणि पुरूषांची लैंगिक क्षमता वेगवेगळी असते. तशी तर महिलांमध्ये नेहमीच शारीरिक संबंधाची इच्छा अधिक असते. पण एक वय असं असतं जेव्हा पुरूषांच्या तुलनेत त्यांची इच्छा ८ पटीने अधिक होते. सामान्यपणे लग्नाचं वय हे १८ ते २१ मानलं जातं. पण शारीरिक संबंधासाठी कोणतं वय अधिक चांगलं असतं हे सर्वांनाच जाणून घ्यायचं असतं. अशात एका सर्व्हेतून समोर आले आहे की, महिलांसाठी मध्यम वय हे सर्वात चांगलं असतं.
(Image Credit : psychologytoday.com)
द हेल्थ साइटने दिलेल्या एका सर्व्हेनुसार, ३५ ते ४० या वयात महिलांची लैंगिक इच्छा अधिक वाढते. या सर्व्हेनुसार, महिलांमध्ये वयाचा दुसरा सर्वात चांगला टप्पा हा २८ नंतरचा मानला जातो. या सर्व्हेनुसार, महिलांची कामेच्छा ३५ ते ४० वयादरम्यान जास्त असते. महिलांनीच या सर्व्हेत सांगितलं की, त्यांची या वया शारीरिक संबंधाची इच्छा अधिक वाढली होती. तसेच त्यांनी हेही मान्य केलं की, या वयातच त्या शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करत होत्या.
आकडेवारीनुसार १७ टक्के महिलांनी हे मान्य केलं की, जेव्हा त्यांचं वय ३५ ते ४० दरम्यान होतं तेव्हा त्यांना शारीरिक संबंधात अधिक आनंद मिळाला. तसेच त्यांनी आठवड्यातून किती वेळा संबंध ठेवत होत्या हेही सांगितलं. त्यांनी सांगितले की, त्या या वयात आठवड्यातून ३ ते ४ वेळा संबंध ठेवत होत्या. या सर्व्हेतील प्रत्येक पाचव्या महिलेने सांगितले की, त्यांची आठवड्यातून ५ ते ६ वेळा शारीरिक संबंधाची इच्छा होत होती.
सर्व्हेत सहभागी महिलांनी आणखी एक गोष्ट मान्य केली की, हा त्यांच्यां लैंगिक जीवनाचा सर्वात चांगला काळ होता. कारण त्यानंतर त्यांची कामेच्छा कमी झाली. सर्व्हेतील सर्वच महिला त्यांच्या लैंगिक जीवनात सुखी होत्या. ३० वर्षांच्या ज्या महिला या सर्व्हेत होत्या त्यांचं मत होतं की, जसजसं त्यांचं वय वाढत होतं, त्यांची कामेच्छा वाढत होती.