लैंगिक जीवन : २० वर्षांआधी कपल्सने MRI मशीनमध्ये ठेवले होते शारीरिक संबंध, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 03:42 PM2019-12-24T15:42:18+5:302019-12-24T15:42:33+5:30
वैज्ञानिकांच्या एका टीमने प्रत्यतक्षात मॅग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग म्हणजे MRI स्कॅनर मशीनमध्ये एका कपलला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते.
तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, पण वैज्ञानिकांच्या एका टीमने प्रत्यतक्षात मॅग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग म्हणजे MRI स्कॅनर मशीनमध्ये एका कपलला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते. शारीरिक संबंध ठेवताना पुरूष आणि महिलेच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो काढणं शक्य आहे का किंवा नाही? हे जाणून घेण्यासाठी २० वर्षांआधी हा प्रयोग करण्यात आला होता.
सर्वात जास्त डाउनलोड केलेला लेख
‘सहवास आणि महिला यौन उत्तेजना दरम्यान पुरुष आणि महिलेच्या प्रायव्हेट पार्टचे मॅग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग’ अशा शीर्षकाचा लेख मेडिकल जर्नल BMJ वर सर्वाधिक डाउनलोड झालेल्या लेखांपैकी एक झाला आहे. पण हा रिसर्च इतका प्रसिद्ध का झालाय? कदाचित लोकांना मोफत शारीरिक संबंध बघणं आवडतं, त्यामुळे असेल.
काय जाणून घ्यायचं होतं?
डच वैज्ञानिकांच्या टीमने केलेल्या या रिसर्चच्या काही उद्देशांपैकी एक उद्देश हाही होता की, शारीरिक संबंधावेळी महिलांच्या शरीरात काय बदल होतात हे जाणून घेणं होता. मुख्य निष्कर्ष हे १३ प्रयोगांवर आधारित होते. ज्यात ८ कपल आणि ३ एकट्या महिलांवर प्रयोग करण्यात आले. यातून समोर आले की, मिशनरी पोजिशनमध्ये शारीरिक संबंध ठेवताना पुरूषांचे प्रायव्हेट पार्ट एका बुमरॅंग आकारासारखे दिसतात. तसेच असंही आढळून आलं की, उत्तेजना वाढल्यावर गर्भाशयाचा आकार वाढत नाही.
पहिल्यांदा कधी प्रकाशित केला होता रिसर्च?
हा रिसर्च युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ग्रॉनिनजेन आणि वीयू अॅमस्टरडॅम युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी मिळून केला होता. २० वर्षांआधी ख्रिसमस निमित्ताने १९९९ मध्ये हा डच रिसर्च पहिल्यांदा ब्रिटीश मेडिकल जर्नल BMJ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्यावेळी कुणीही असा विचार केला नव्हता की, हा लेख पुढे जाऊन उपयोगात पडणार आहे. पण हा लेख MBJ वर सर्वात जास्त डाउनलोड झलेला लेख आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये हा रिसर्च ५० वेळा वाचला गेला होता.