लैंगिक जीवन : मला जास्त उत्तेजना होत नाही त्यामुळे पती नाराज होतो, काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:23 PM2020-03-06T16:23:47+5:302020-03-06T16:25:37+5:30
तुमच्या समस्येचं कारण दुसरंच काहीतरी असावं, ज्यामुळे तुमच्या परमोच्च आनंदात अडथळा निर्माण होतो आहे.
(Image Credit : epsychology.in)
प्रश्न - माझं वय ४० आहे. मला थायरॉइडची समस्या असल्याने उत्तेजना कमी जाणवते. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी माझे पती नाराज होतात. यावर काय उपाय आहे?
उत्तर - सामान्यपणे थायरॉइडमुळे उत्तेजना फार कमी होईल असं होत नाही. तसेही थायरॉइड कंट्रोल करण्यासाठी बाजारात अनेक औषधे मिळतात. ही औषधे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. तुमच्या समस्येचं कारण दुसरंच काहीतरी असावं, ज्यामुळे तुमच्या परमोच्च आनंदात अडथळा निर्माण होतो आहे.
मुळात आपल्या देशात अनेकांना हे माहीतच नसतं की, थेट शारीरिक संबंध सुरू करण्याआधी केली जाणारी क्रिया म्हणजे फोरप्ले उत्तेजना वाढवण्यासाठी फार महत्वाचा असतो. फोरप्लेसाठी पुरेसा वेळ दिला तर महिलांची उत्तेजना भरपूर वाढू शकते. त्यामुळे पुरूषांना हे समजायला पाहिजे की, आनंद केवळ ठिकाणावर पोहोचल्यावरच नाही तर प्रवासातही मिळतो.
मुख्य क्रिया कधी सुरू करायची याचा निर्णय महिलेवर सोडला पाहिजे. कारण त्या पूर्णपणे उत्तेजित झाल्या की नाही हे केवळ त्यांनाच माहीत असतं. सगळं काही व्यवस्थित व्हावं यासाठी दोघांनी बोलणं महत्वाचं आहे.
म्हणजे महिलेने पार्टनरला सांगावं की, त्यांना कशाप्रकारचा आणि कुठे स्पर्श केल्यावर आवडतं किंवा उत्तेजना जाणवते. मुळात मुद्दा हा आहे की, पुरेशी उत्तेजना जाणवली नाही तर पेनिस्ट्रेशनवेळी महिलांना वेदना होता. कारण त्यावेळी त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये उत्तेजनेमुळे निर्माण होणारा नैसर्गिक ओलावा नसतो.
जर याचप्रकारे वेदना होत राहिल्या तर दोघेही सहवासाचा पुरेसा आनंद घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा शारीरिक संबंधाची ओढ तेवढी राहत नाही. असंच नेहमी सुरू राहिलं तर त्यांची कामेच्छाही कमी होऊ शकते.
(नोट - अनेक पुरूषांना शीघ्रपतानाची समस्या असते. अशात ते फोरप्ले जास्त वेळ देऊ शकत नाहीत आणि लगेच मुख्य क्रियेकडे वळतात. त्यामुळे त्यांच्या पार्टनर प्रायव्हेट पार्टमध्ये पुरेसा ओलावा राहत नाही. त्यामुळे पुरूषांनी फोरप्लेला अधिक वेळ दिला पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक वापरायला पाहिजे.)