लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर का होतं व्हजायनल इन्फेक्शन? काय आहेत कारणे....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 03:41 PM2020-01-18T15:41:19+5:302020-01-18T15:41:47+5:30

शारीरिक संबंधाशी संबंधित एकाही सावधानीकडे दुर्लक्ष केलं गेलं तर याने आरोग्याला नुकसान होऊ शकतं.

Sex Life: Why Vaginal Infection Occurs After Sex? | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर का होतं व्हजायनल इन्फेक्शन? काय आहेत कारणे....

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर का होतं व्हजायनल इन्फेक्शन? काय आहेत कारणे....

googlenewsNext

शारीरिक संबंधाशी संबंधित एकाही सावधानीकडे दुर्लक्ष केलं गेलं तर याने आरोग्याला नुकसान होऊ शकतं. लैंगिक जीवनात खासकरून जास्तीत जास्त महिलांना व्हजायनल इन्फेक्शनचा सामना करावा लागतो. अनेकदा महिला ही तक्रार करत असतात की, शारीरिक संबंध ठेवताना किंवा त्यानंतर त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होतात आणि इन्फेक्शन होतं.

इतकेच नाही तर काही महिलांची अशीही तक्रार असते की, कंडोमच्या मदतीने सुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही त्यांना प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शनची समस्या झाली आहे. मुळात अशाप्रकारची समस्या महिला आणि पुरूष दोघांमध्येही वेगाने पसरत आहे. त्यामुळे याबाबतची माहिती महिला आणि पुरूषांना सुद्धा माहीत असली पाहिजे.

शारीरिक संबंधानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये होणारं इन्फेक्शन

बॅक्टेरिअल व्हेजिनोसिस

बॅक्टेरिअल व्हेजिनोसिस व्हजायनामध्ये होणाऱ्या इन्फेक्शनचं मुख्य कारण असतं. याला व्हजायना बॅक्टेरियोसिस या नावानेही ओळखलं जातं. १५ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये शारीरिक संबंधानंतर हे इन्फेक्शन अधिक बघायला मिळतं. त्यासोबतच सेक्स पार्टनर बदलल्यामुळेही याचा धोका वाढतो. तसेच ज्या महिलांनी आतापर्यंत शारीरिक संबंधच ठेवले नसतील अशा महिलांना सुद्धा हे इन्फेक्शन होतं. पण याचं प्रमाण फारच कमी असतं.

व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन

व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन हे लैंगिक संबंधातून होणारं इन्फेक्शन मानलं जात नाही. पण शारीरिक संबंधानंतरच व्हजायनामध्ये फंगस किंवा कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनचा धोका सर्वात जास्त वाढतो. हे इन्फेक्शन शारीरिक संबंध आणि स्वच्छतेची काळजी न घेतल्याने होऊ शकतं. 

ओरल सेक्सनेही होऊ शकतं इन्फेक्शन

अनेक कपल्सना वाटतं की, केवळ इंटरकोर्समुळेच व्हजायनल इन्फेक्शनचा धोका असतो. पण अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, ओरल सेक्समुळेही व्हजायनल इन्फेक्शन होऊ शकतं. कारण यावेळी पार्टनर तोंडाचा वापर करतात, त्यांच्या तोडांतील अनेक बॅक्टेरिया किंवा फंगस व्हजायनामध्ये जाऊन इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.

हेही माहीत असावं

सीडीसी (Centers for Disease Control and Prevention) (CDC) च्या एका अंदाजानुसार, अमेरिकेतील  जवळपास ७५ टक्के महिला अशाप्रकारच्या शारीरिक संबंधातून होणाऱ्या इन्फेक्शनचा सामना करतात. यातील ४० ते ४५ टक्के महिला दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा व्हजायनल इन्फेक्शनच्या समस्येतून गेलेल्या असतात.

व्हजायनल इन्फेक्शनची आणखी काही कारणे

- भिजलेले किंवा घाम शोषूण न घेणारे अंडरगारमेट्स वापरणे

- प्रायव्हेट पार्टची व्यवस्थित स्वच्छता न करणे

- प्रायव्हेट किंवा त्याच्या आजूबाजूला सुगंधित क्लिंजरचा वापर करणे

- गर्भनिरोधक गोळ्या, अ‍ॅंटी-बायोटिक्सच्या वापराने देखील हे इन्फेक्शन होऊ शकतं.

काय करावे उपाय?

तज्ज्ञ आवर्जून सांगतात की, शारीरिक संबंधानंतर न विसरता लघवीला जावे. तसेच प्रायव्हेटची स्वच्छता स्वच्छ पाण्याने करावी. याने व्हजायनल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. त्यासोबतच अनेकदा कंडोममुळेही व्हजायनल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे नेहमी चांगल्या क्वालिटीच्या आणि विश्वासू ब्रॅन्डचेच कंडोम वापरावे. 


Web Title: Sex Life: Why Vaginal Infection Occurs After Sex?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.