लैंगिक जीवन : लग्नानंतर शारीरिक संबंधामुळे वजन वाढत असतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:00 PM2019-12-31T15:00:54+5:302019-12-31T15:01:01+5:30
शारीरिक संबंध हा एक विषय आहे ज्याबाबत लोकांच्या मनात सतत काहीना काही प्रश्न येत असतात. कारण त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
शारीरिक संबंध हा एक विषय आहे ज्याबाबत लोकांच्या मनात सतत काहीना काही प्रश्न येत असतात. कारण त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काहींच्या समस्या माहितीच्या अभावामुळे निर्माण होतात तर काहींना वेगळ्या कारणाने. आता हेच बघा...काही कॉमन पण महत्वाची प्रश्ने लोकांच्या मनात पडतात. त्याचीच उत्तरे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
शारीरिक संबंधानंतर वजन वाढतं का?
अनेकांना असं वाटतं की, लग्नानंतर सेक्शुअल रिलेशनमुळे वजन वाढतं. हा गैरसमज अनेकांमध्ये असतो. पण सत्य तर हे आहे की, शारीरिक संबंध हा एकप्रकारे प्रभावी एक्सरसाइज आहे. ज्याने हृदयाची गती वाढून आणि रक्तप्रवाह वाढून कॅलरी बर्न होतात. अर्थात याने वजन नियंत्रणात राहतं. जर तुमचं वजन वाढत असेल तर आधी तुमच्या लाइफस्टाईलवर आणि खाण्या-पिण्याच्या सवयींवर लक्ष द्या.
रोज संबंध ठेवावे का?
हा सुद्धा सगळ्यात जास्त लोकांच्या मनात येणारा प्रश्न आहे. मुळात प्रत्येक व्यक्तीची खाण्या-पिण्याची सवय एकसारखी नसते. सवयी आणि विचारही कमीच एकमेकांसारखे असतात. हीच बाब सेक्शुअल रिलेशनवरही लागू पडते. ही बाब कपलवर अवलंबून असते. यात दोघांच्या इच्छा महत्वाच्या असतात. यात कोणताही नियम नाही. दोघे सहज असतील, त्यांना शक्य असेल तर ते कधीही शारीरिक संबंध ठेवू शकतात. चांगल्या लैंगिक जीवनाचा आरोग्यावरही सकारात्मक प्रभाव पडतो.
दोघेही संबंध न ठेवता हस्तमैथुन एन्जॉय करतो?
ही बाब व्यक्ती विशेष आहे. सेक्शुअल गोष्टी तुम्ही कसे एन्जॉय करता हे तुमच्यावर आहे. जर दोघांनाही हस्तमैथुन करण्यात आनंद मिळत असेल तर त्यात गैर किंवा नुकसानकारक काहीच नाही. तसेच लैंगिक जीवनात नवनवीन प्रयोग करत राहणे गरजेचं आहे. दोघांनाही हा बदल चांगला वाटत असेल तर त्यात चूक काही नाही.
आमचं लैंगिक जीवन आता संपलंय....
लग्नाच्या काही वर्षांनी काहींच्या मनात अशी शंका येते. इच्छा कमी होण्याला तुमचा अपराध समजू नका. तुम्ही एक सामान्य मनुष्य आहात आणि महिलांच्या सुद्धा सेक्शुअल इच्छा व फॅंटसीज असतात. ज्या पूर्णपणे योग्य आणि सामान्य बाब आहे. मुळात दोघांनी नव्याने कामेच्छा जागी करण्यासाठी किंवा लैंगिक जीवनात नवा रोमांच आणण्यासाठी नवीन काहीतरी प्रयोग केला पाहिजे.