लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मच्या अनुभवासाठी फायदेशीर ठरतील 'या' टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 04:09 PM2019-03-20T16:09:09+5:302019-03-20T16:10:33+5:30
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, भारतात ऑर्गॅज्मचा अनुभव मिळणाऱ्या महिलांचा संख्या फार कमी आहे.
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, भारतात ऑर्गॅज्मचा अनुभव मिळणाऱ्या महिलांचा संख्या फार कमी आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे अनेक महिलांना याबाबत माहिती सुद्धा नाही. यामुळे त्यांना संतुष्टी मिळण्याचं प्रमाण फारच कमी आहे. जर तुम्हालाही तुमच्या पार्टनरला पूर्ण संतुष्टी मिळवून द्यायची असेल तर तुम्हीच त्यांची मदत करायला हवी. यासाठी काही टिप्स तुमच्या कामात येतील.
फोरप्ले
लैंगिक क्रियेमध्ये फोरप्ले फार महत्त्वाची भूमिका बजावतो. फोरप्लेमुळे महिला उत्तेजित तर होतातच सोबतच त्यांना रिलॅक्स होण्यासही मदत मिळते. ही क्रिया ऑर्गॅज्मचा अनुभव मिळण्यासाठी फारच फायदेशीर ठरते.
पार्टनरसोबत बोला
शारीरिक संबंधादरम्यान बोलणे काही कपल्सना फार विचित्रि किंवा अडचणीचं वाटतं. पण जर तुम्ही अशं कराल तर एकमेकांच्या पसंतीबाबत जाणून घेऊ शकाल. याने तुम्हा दोघांनाही संतुष्टी मिळण्यास फायदा होईल. याने खासकरून तुमच्या महिला पार्टनरला ऑर्गॅज्मचा अनुभव मिळण्यास मदत होईल.
कम्फर्ट
सेक्शुअल फॅंटसी रिअल लाइफमध्ये ट्राय करण्यासाठी पार्टनरची कम्फर्ट लेव्हल जाणून घ्या. जर पार्टनरला एखादी जागा किंवा पोजिशन पसंत नसेल तर तुमची इच्छा असूनही तुम्ही त्यांना ऑर्गॅज्मचा आनंद देऊ शकणार नाहीत.
नवीन काही ट्राय करा
नेहमी नेहमी शारीरिक संबंधासाठी एकच पोजिशन ट्राय करणे चुकीचे आहे. याने तुमच्या लैंगिक नात्यात कंटाळा लवकर येईल. त्यामुळे वेगवेगळ्या पोजिशन ट्राय करायला हव्यात. पण यात दोघांचीही सहमजी आणि दोघांनाही कम्फर्ट असावा. याने ऑर्गॅज्मचा आनंद मिळण्यास मदत होईल.
रफ असू नये
फार कमी महिला अशा असताना ज्यांना रफ लैंगिक क्रिया पसंत असते. पण हेही विसरू नये की, लैंगिक क्रिया ही केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या पार्टनरसाठीही आनंददायी असावी. तेव्हाच पार्टनरला संतु्ष्ट करू शकाल.