लैंगिक जीवन : ३०-४० वयाच्या महिलांमध्ये वाढते 'ही' समस्या, जाणून घ्या कारण आणि उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 02:59 PM2019-04-01T14:59:37+5:302019-04-01T14:59:50+5:30
वजायनल ड्रायनेस ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येचा सामना प्रत्येक महिलेला कधी ना कधी करावा लागतो.
(Image Credit : Medical News Today)
वजायनल ड्रायनेस ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येचा सामना प्रत्येक महिलेला कधी ना कधी करावा लागतो. ३० ते ४० वयादरम्यान महिलांमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आणि स्ट्रेसमुळे ही समस्या अधिक वाढते. ज्याचा प्रभाव त्यांच्या लैंगिक जीवनावरही बघायला मिळतो. जर तुम्हालाही अशाप्रकारची काही समस्या होत असेल तर याची कारणे आणि यावरील उपाय तुम्हाला माहीत असायला हवेत.
काय आहे ही समस्या?
वजायनल ड्रायनेसही समस्या साधारण ३० ते ४० वयातील महिलांमध्ये बघायला मिळते. या समस्येमुळे शारीरिक संबंधावेळी गुप्तांगामध्ये कोरडेपण येतो आणि लुब्रिकंट नष्ट होतं. त्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान त्रास होतो. अनेकदा घर्षणामुळे वजायनाची त्वचाही खरचटली जाते.
काय आहे कारण?
या समस्येच्या काही मुख्य कारणांमध्ये स्ट्रेस हे कारणही सांगितलं जातं. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा शरीरात सेक्स हार्मोन्सची निर्मिती कमी होते. ज्याकारणाने वजायना नैसर्गिक पद्धतीने लुब्रिकंट होऊ शकत नाही. तसेच अनेकदा गुप्तांगाची योग्यप्रकारे स्वच्छता न केल्यासही ही समस्या अधिक वाढू शकते. वजायनल ड्रायनेसमुळे शारीरिक संबंधावेळी फार वेदना होतात.
काय आहे उपचार?
वजायनल ड्रायनेस ही महिलांमध्ये आढळणारी सामान्य समस्या आहे. जर तुम्हालाही अशी समस्या होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सामान्यपणे डॉक्टर अॅंटी-बायोटिक देऊन यावर उपचार करतात. तसेच लुब्रिकंटचा वापर करणेही फायदेशीर ठरू शकतं. याने शारीरिक संबंधावेळी घर्षण होणार नाही. मात्र लुब्रिकंट कोणतं वापरावं याची माहिती तज्ज्ञांकडून घ्यावी. तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगलं लुब्रिकंट असलेला पातळ कंडोमही वापरण्यास सांगू शकता. पण यावर कोणतेही घरगुती उपाय करू नका. काहीही करायचं असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा.