लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवणे बंद केल्यास शरीरात होतात 'हे' बदल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:26 PM2019-02-05T15:26:03+5:302019-02-05T15:26:09+5:30
कारण कोणतही असो पण प्रत्येकाच्याच लाइफमध्ये एक अशी वेळ येते, जेव्हा ते शारीरिक संबंध ठेवत नाहीत. याला वेगवेगळी कारणे असतात.
कारण कोणतही असो पण प्रत्येकाच्याच लाइफमध्ये एक अशी वेळ येते, जेव्हा ते शारीरिक संबंध ठेवत नाहीत. याला वेगवेगळी कारणे असतात. बदलती लाइफस्टाइल असेल, आहाराची समस्या असेल किंवा शारीरिक काही समस्या असेल, जोडीदारासोबतचा वाद असेल यामुळे अनेकजण लैंगिक जीवनात काहीच करत नाहीत. कारण काहीही असो पण शारीरिक संबंध न ठेवण्याच्या निर्णयामुळे शरीरात वेगवेगळे बदल होतात. ते काय हे जाणून घेऊ....
जवळीकता कमी
जोडीदारासोबत नियमितपणे शारीरिक संबंध ठेवल्याने दोघांमध्ये एक चांगली जवळीकता तयार होते. दोघांमध्ये भावनिकता वाढते. पण जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवणं बंद करता तेव्हा याचा प्रभाव दोघांच्या बॉंडिंगवरही पडतो. दोघांची भावनिक जवळीकता कमी होऊ लागते.
कामेच्छा कमी-जास्त
शारीरिक संबंध न ठेवल्याने व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळा प्रभाव पडतो. म्हणजे अनेक दिवस किंवा महिने शारीरिक संबंध न ठेवल्याने असं होऊ शकतं की, तुमची कामेच्छा प्रमाणापेक्षा जास्त वाढेल किंवा फारच कमी होईल. हा बदल वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळा बघायला मिळतो.
चिंता आणि तणाव वाढतो
हे तर तुम्हाला माहीत असेलच की, शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरातून फील गुड हार्मोन्स जसे की, ऑक्सिटोसिन, इंडॉर्फिन आणि डोपामाइन रिलीज होतात. याने तुम्हाला रिलॅक्स आणि वाटतं. तसेच शारीरिक संबंधामुळे स्ट्रेसही दूर होतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस असेल तर शारीरिक संबंधाने दूर होतो. अशात जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवणे अचानक बंद करत असाल तर तुम्ही तणावात राहू शकता.
झोप येण्यास अडचण
शारीरिक संबंध न ठेवल्याने झोपेचा संबंध शरीराच्या हार्मोन्ससोबत आहे. म्हणजेच जर तुम्ही नियमित शारीरिक संबंध ठेवले तर शरीरातून रिलीज होणाऱ्या फील गुड हार्मोन्समुळे तुम्हाला चांगलं वाटतं. पण शारीरिक संबंध ठेवणं बंद केल्याने याचा झोपेवर परिणाम होतो. झोप न येणे किंवा पुरेशी झोप न होणे या समस्या उद्भवतात.