लैंगिक जीवन : महिलांची शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता अधिक वाढण्याचं गुपित उघड!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:52 PM2019-06-19T15:52:31+5:302019-06-19T15:54:42+5:30
महिला आणि पुरूष दोघांसाठीही शारीरिक संबंध ठेवणे गरज आहे. जेव्हा दोन व्यक्ती हे खाजगी क्षण अनुभवतात तेव्हा एकमेकांच्या खूप जवळ येतात.
महिला आणि पुरूष दोघांसाठीही शारीरिक संबंध ठेवणे गरज आहे. जेव्हा दोन व्यक्ती हे खाजगी क्षण अनुभवतात तेव्हा एकमेकांच्या खूप जवळ येतात. याने नातं आणखी मजबूत होतं, सोबतच दोघांचं प्रेमही वाढतं. पण आजही असे काही कपल्स आहेत, जे शारीरिक संबंधाबाबत मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. आणि याबाबत त्यांना योग्य ती माहितीही मिळू शकत नाही. सामान्यपणे असं मानलं जातं की, पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता अधिक असते. याबाबत नुकताच एक रिसर्च करण्यात आलाय. ज्यातून यामागचं कारण समोर आलं आहे.
शोधातून महत्त्वपूर्ण माहिती
या रिसर्चदरम्यान अभ्यासकांना हे कळालं की, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तेवढ्याच उत्तेजित असतात जेवढे पुरूष असतात. या रिसर्चमधून एक जी महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे ज्या महिला त्यांना हवी तेवढी झोप घेऊनही अतिरिक्त १ तास अधिक झोप घेतात. त्यांच्यात शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा १४ टक्क्यांनी अधिक वाढते.
१७१ महिलांवर रिसर्च
अभ्यासकांनी या रिसर्चसाठी १७१ तरूण महिलांना सहभागी करून घेतले होते. या रिसर्चशी संबंधित तज्ज्ञांनी महिलांच्या रोजच्या खाण्या-पिण्यावर, झोपण्यावर आणि शारीरिक संबंध ठेवण्यासारख्या रोजच्या क्रियांवर जवळपास दोन आठवडे लक्ष ठेवले. यादरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं की, जास्त झोप घेतल्याने महिलांची केवळ शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा वाढते असं नाही तर त्या यातून जास्त आनंद मिळवतात आणि त्या पुरूषांपेक्षा अधिक चांगलं परफॉर्मही करू शकतात.
इंटरकोर्सच्या इच्छेचा संबंध झोपेशी
अभ्यासकांना या रिसर्चमधून आढळलं की, महिला जेवढी जास्त झोप घेतात, जेवढी चांगली झोप घेतात तेवढी त्यांच्यात इंटरकोर्सची इच्छा आणखी प्रबळ होते. या रिसर्चमध्ये प्रतिदिवस सरासरी ७ तास २२ मिनिटांपेक्षा अधिक झोप घेणाऱ्या महिलांमध्ये झोपेचे वाढत्या तासांनुसार रोमान्स मध्ये इच्छा वाढताना दिसली.