झोपण्याच्या पद्धतीचा लव्ह आणि सेक्स लाइफला बसतो फटका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 10:36 AM2020-12-11T10:36:11+5:302020-12-11T10:38:06+5:30

आता तर एका रिसर्चमधून याला दुजोरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊ कोणती गोष्ट तुमच्या लव्ह आणि सेक्स लाइफवर प्रभाव करते.

Sleeping pattern says a lot about your love and sex life | झोपण्याच्या पद्धतीचा लव्ह आणि सेक्स लाइफला बसतो फटका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

झोपण्याच्या पद्धतीचा लव्ह आणि सेक्स लाइफला बसतो फटका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

googlenewsNext

आपल्या लव आणि सेक्स लाइफवर रोजच्या जीवनातील वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. हा दावा आमचा नाही तर एका रिसर्चमधून करण्यात आलाय. पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात या गोष्टींकडे आपलं लक्षच जात नाही. अनेकदा तर या गोष्टी आपल्याला माहीत असतात पण त्याकडे गंभीरतेने बघितलं जात नाही. आता तर एका रिसर्चमधून याला दुजोरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊ कोणती गोष्ट तुमच्या लव्ह आणि सेक्स लाइफवर प्रभाव करते.

यूनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये हा रिसर्च करण्यात आला आहे. या रिसर्चनुसार, उशीरा झोपणाऱ्या लोकांचं रिलेशन जास्त काळ टिकत नाही. रिसर्चनुसार, असे लोक मग ते पुरूष असो वा महिला ते आपल्या रिलेशनला गंभीरतेने घेत नाहीत.

कोणते लोक फिजिकल रिलेशनमध्ये अधिक आनंद घेतात

रिसर्चनुसार, जे लोक उशीरा झोपतात आणि झोपेतून उशीरा उठतात ते लोक लवकर झोपणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त फिजिकल रिलेशन बनवतात. या लोकांमध्ये फिजिकल रिलेशन ठेवण्याबाबत जास्त आक्रामकता बघायला मिळाली आहे. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, असे लोक दिवसातून २ ते ३ वेळा फिजिकल रिलेशन ठेवतात.

आणखी एक महत्वाचा मुद्दा रिसर्चमधून समोर आाला आहे की, जे लोक रात्री लवकर झोपतात आणि सकाळी लवकर उठतात ते त्यांच्या नात्याबाबत फार गंभीर असतात. ते त्यांच्या पार्टनरच्या प्रत्येक छोट्या गोष्टींची काळजी घेतात, लक्ष ठेवतात. रिसर्चमधून असा दावा करण्यात आला आहे की, अशा लोकांचं नातं जास्त काळ टिकून राहतं. आणि त्यांचं नेहमी एकमेकांवर प्रेम राहतं.
 

Web Title: Sleeping pattern says a lot about your love and sex life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.