लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरुषांना काय वाटतं? रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 03:54 PM2019-04-26T15:54:55+5:302019-04-26T15:59:09+5:30
शारीरिक संबंध ठेवण्यावरुन एका सामान्य धारणा ही आहे की, पुरुष आनंद मिळवण्यासाठी शारीरिक संबंध ठेवतो.
शारीरिक संबंध ठेवण्यावरुन एक सामान्य धारणा ही आहे की, पुरुष आनंद मिळवण्यासाठी शारीरिक संबंध ठेवतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, याच्या उलट बाब समोर आली आहे. शोधादरम्यान समोर आलेले निष्कर्ष हैराण करणारे आहेत. या रिसर्चनुसार, शारीरिक संबंध ठेवण्याच्या काही वेळानंतर काही पुरुषांना वाईट वाटतं.
जर्नल ऑफ सेक्स अॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित शोधानुसार, महिलांप्रमाणे पुरुष सुद्धा पोस्टकॉइटल डिस्फोरियाने पीडित असू शकतात. पीसीडी एक असा आजार आहे ज्यात शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लगेच उदासीनता, चिंता, चिडचिडपणा आणि राग या भावना उत्पन्न होतात.
ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलॅंड यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यासकांनी सांगितले की, याप्रकारची तक्रार याआधी महिलांमध्ये पाहिली गेली होती. पण पुरुषांमध्ये याप्रकारची समस्या होते, हे पहिल्यांदाच समोर आलं आहे.
अभ्यासक जोएल मॅकज्कोविएक यांनी सांगितले की, हा शोध ऑनलाइन सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला होता. ज्यात ऑस्ट्रेलिया, यूके, रशिया, न्यूझीलॅंड, जर्मनी आणि इतर देशांमधील १ हजार २०८ पुरुषांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं.
रिसर्चनुसार, ४० टक्के लोकांनी आपल्या संपूर्ण जीवनात पीसीडीचा अनुभव आल्याची बाब मान्य केली. तेच २० टक्के लोकांनी चार आठवड्यातून एकदा पीसीडीचा अनुभव आल्याचं मान्य केलं.