लैंगिक जीवन : महिलांच्या लैंगिक इच्छांबाबत सर्व्हेतून समोर आल्या 'या' गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 02:46 PM2019-08-29T14:46:14+5:302019-08-29T14:51:58+5:30
महिलांना शारीरिक संबंध ठेवताना काय हवं असतं किंवा त्यांची काय इच्छा असते, याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता.
(Image Credit : Social Media)
महिलांना शारीरिक संबंध ठेवताना काय हवं असतं किंवा त्यांची काय इच्छा असते, याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. हा सर्व्हे जर्नल ऑफ सेक्स अॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये महिलांच्या परमोच्च आनंदाबाबत(ऑर्गॅज्म) अभ्यास करण्यात आला.
(Image Credit : elitedaily.com)
या सर्व्हेमध्ये १, ०५५ महिलांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वच महिला अमेरिकेत राहणाऱ्या होत्या. आणि या महिलांचं वय १८ ते ९४ दरम्यान होतं. अभ्यासकांनी या महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबत वेगवेगळे प्रश्न विचारले.
(Image Credit : news18.com)
इंडियाना युनिव्हर्सिटीच्या डेबी हरबॅनिक म्हणाल्या की, त्यांनी या सर्व्हेमधून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, महिलांना बेडरूममध्ये किंवा शारीरिक संबंधावेळी काय हवं असतं? महिलांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ३६ टक्के महिलांनी सांगितले की, शारीरिक ठेवताना परमोच्च आनंद मिळवण्यासाठी त्या क्लिटोरल उत्तेजनेचा आधार घेतात. तेच पाच टक्क्यांपेक्षाही कमी महिलांना सांगितले की, शारीरिक संबंधादरम्यान ऑर्गॅज्मचा अनुभव येण्यासाठी त्यांच्या इंटरकोर्सच पुरेसा आहे.
(Image Credit : Huffingtonpost.in)
तसेच ३६ टक्के महिलांनी असही मान्य केलं की, शारीरिक संबंधादरम्यान ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना क्लिटोरल उत्तेजनेची गरज नाही. या सर्व्हेमध्ये महिलांनी त्यांच्या लैंगिक इच्छांबाबत मोकळेपणाने चर्चा केली आणि सांगितले की, त्यांना पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना काय हवं असतं.
तर सर्व्हेमध्ये भाग घेणाऱ्या महिलांच्या अर्ध्यापेक्षा कमी महिलांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यात आणि भावनात्मक रूपान जुळणे सर्वात चांगलं वाटतं.