३ प्रकारचे असतात पॉर्न बघणारे, तुम्ही यातील कोणते?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 04:31 PM2019-08-12T16:31:28+5:302019-08-12T16:32:27+5:30
तुम्ही वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये पॉर्न बघण्याचे फायदे आणि तोटे यांबाबत वाचलं असेल. हे वेगवेगळे रिसर्च वाचून काही लोकांनी त्यांच्या सवयी बदलल्या देखील असतील.
तुम्ही वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये पॉर्न बघण्याचे फायदे आणि तोटे यांबाबत वाचलं असेल. हे वेगवेगळे रिसर्च वाचून काही लोकांनी त्यांच्या सवयी बदलल्या देखील असतील. पण तरूण-वयस्क महिला आणि पुरूष दोघेही पॉर्न बघतात हे वेळोवेळी पॉर्न साइट्सकडून जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीवरून कळून येतं.
तसेच कोण कशाप्रकारचे पॉर्न बघतात हेही समोर येत असतं. अशात आता पॉर्न बघणाऱ्या लोकांचे प्रकार समोर आले आहेत. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, पॉर्न बघणारे लोक तीन प्रकारचे असतात. चला जाणून घेऊ तीन प्रकार...
एकसारखे नसतात पॉर्न बघणारे लोक
पॉर्न बघणारे लोक हे एकसारखे नसतात. त्यांना तीन ग्रुप्समध्ये विभागलं जाऊ शकतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या तीन ग्रुप्समधील केवळ एकच कॅटेगरी हेल्दी मानली जाते.
इतक्या प्रकारचे असतात पॉर्न बघणारे
जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, पॉर्न बघणारे तीन प्रकारचे लोक प्रकारचे असतात. मजेसाठी बघणारे, सवय लागलेले आणि दु:खी.
मजेसाठी पॉर्न बघणारे
या रिसर्चमध्ये सहभागी झालेले लोक याच ग्रुपमधील आहेत. पॉर्न बघणारे ७५ टक्के प्रेक्षक असेच आहेत, जे मजेसाठी पॉर्न बघतात. हे लोक दर आठवड्याला साधारण २४ मिनिटे पॉर्न बघतात. हा तो ग्रुप आहे ज्यात महिलांची संख्या जास्त आहे आणि ज्या कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहेत. या ग्रुपला हेल्दी श्रेणीमध्ये ठेवलं जातं.
दु:खी आणि सवय असलेला ग्रुप
या दोन ग्रुपचे लोक पॉर्न बघण्याचं कनेक्शन त्यांच्या इमोशनल अडचणींशी, समस्यांशी जोडतात. तर या ग्रुपमधील लोक आठवड्यातून साधारण १७ मिनिटे पॉर्न बघतात.