प्रणयावेळी अशा गोष्टी असतात ज्या दोघांना जाणवतात पण..
By admin | Published: April 27, 2017 09:46 PM2017-04-27T21:46:18+5:302017-04-28T06:24:13+5:30
आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या नात्यातील "तो" काळ नक्कीच आनंदी होईल.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - प्रणयावेळी भरपूर अशा गोष्टी असतात ज्या दोघांना जाणवतात. परंतु, त्याबद्दल ते कधीच बोलत नाही. यापाठीमागे भरपूर कारणे आहेत. कधी-कधी पुरुष अथवा स्त्री लाजाळू स्वभावाचे असतात, सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेंकावर असणारे प्रेम. अशा वेळी तुमची एक चुकीची गोष्ट प्रणयाचा मुड खराब करु शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या नात्यातील "तो" काळ नक्कीच आनंदी होईल.
आपल्या मनातील भावना व्यक्त करा - आपण सेक्स करताना आपल्याला नक्की काय फिल होतयं, काय जाणवतं आहे हे आपल्या पार्टनरला आपल्या कृतीतून दिसून द्या. त्यांना आपल्या भावना आपल्या कृतीतून व्यक्त करा. जेणे करून त्यांचा तुम्हांला आणि तुमच्या पार्टनरला सेक्समध्ये नेहमीच फायदा होईल.
संवेदनशील स्पर्श - पुरुष ज्यावेळेस तुमच्या शरिराला स्पर्श करतो तेव्हा तुम्ही उत्तेजित होता, यातून त्याला आनंद मिळतो. त्यामुळे पुरुषाला पुन्हा-पुन्हा त्या जागी स्पर्श करायला आवडते. लक्षात ठेवा प्रेत्येक स्त्रीची संवेदनशील जागा वेगवेगळी असू शकते.
सेक्स करताना "किस" करण्याची गरज असते -
लक्षात ठेवा नेहमी सेक्स करताना किस करण्याची गरज असते.. किस केल्याने आपल्या पार्टनरशी तुम्ही सतत एकरूप राहतात. अनेकजण विचार करतात की, सेक्स करताना जर किस केला तर सेक्समध्ये लक्ष राहणार नाही. पण हा अत्यंत चुकीचा समज आहे. त्यामुळे सेक्स करताना किस केल्यास तुमचा पार्टनर जास्त उत्तेजित होतो. आणि त्याला संतुष्टी मिळते
सेक्सच्या वेळेस पार्टनरला चावणं चुकीचं - अनेक पार्टनर हे सेक्स करताना खूपच जोशात आलेले असतात. त्यामुळे आपल्या पार्टनरचा मूड असो किंवा नसो खूप जोशात सेक्स करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे आपल्या पार्टनरला विशेष अंगाला चावले जाते. आणि त्यामुळे आपला पार्टनर आपल्यापासून नाराज होतात. त्यामुळे आपल्या पार्टनरचा मूड कसा आहे ते पाहूनच "लव बाईट" करणं गरजेचं आहे.
सेक्सचा आनंद घ्या अतिरेक नको - बऱ्याच वेळेस खूप जोडपे अश्लील प्रकारे सेक्स करण्याचा आग्रह असतो. पण असं करताना आपल्या पार्टनरला याबाबत काय वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सेक्स करताना आपला पार्टनरला आपण किती समजून घेतो ते महत्त्वाचं आहे. आपण अश्लील सेक्स करण्याचा प्रयत्न केल्यास बऱ्याचदा आपलं पार्टनर आपल्यापासून दूर जाऊ शकतो
प्रणयानंतरच्या भावना - प्रणयानंतर तुम्ही कसे ऐकमेकांना जवळ घेता यावरुन तुमच्या भावना ऐकमेकांना जाणवत असतात. फक्त स्त्रीयांनाच नाही तर पुरुषांनाही ही गोष्ट जाणवते. यामुळे तुमचे नाते फुलण्यास मदत होते.