'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 05:28 PM2018-10-23T17:28:15+5:302018-10-23T17:29:10+5:30
आजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेसचं सर्वात मोठं कारण म्हणजे सेक्शुअर हेल्थ मानलं जातं. अनेकदा नियमांनुसार चालूनही कपलमध्ये सगळंकाही ठिक नसतं.
आजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेसचं सर्वात मोठं कारण म्हणजे सेक्शुअर हेल्थ मानलं जातं. अनेकदा नियमांनुसार चालूनही कपलमध्ये सगळंकाही ठिक नसतं. तुमचं लैंगिक जीवन जर सुरळीत नसेल तर याचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. समस्या अधिक असतील मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. याला काही चुकीच्या सवयीही कारणीभूत आहेत. त्यामुळे तुम्हाला जर चांगलं लैंगिक जीवन हवं असेल तर या सवयी टाळण्यात फायदा आहे.
प्रमाणापेक्षा जास्त हस्तमैथून
एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त हस्तमैथून करत असाल तर भविष्यात तुमचं लैंगिक जीवन अडचणीत येऊ शकतं. यामुळे लैंगिक जीवनात जास्त उत्साह राहत नाही, असंही तज्ज्ञ सांगतात.
उत्तेजना वाढते
तज्ज्ञ सांगतात की, जास्त हस्तमैथून केल्याने हस्तमैथूनानंतर डोपामाईन रिलीज होतं, जे एक न्यूरोट्रान्समीटर आहे. ज्याने व्यक्तीला आनंद मिळतो आणि रिलॅक्स वाटतं. खूप जास्त हस्तमैथून केल्याने उत्तेजना अधिक वाढते आणि डोपामाईन रिलीज होतं असल्याने तुमचा मेंदू लैंगिक प्रक्रियेकडे लक्ष देणं कमी करतो.
स्मोकिंगची सवय सोडा
BJU इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, धुम्रपान म्हणजेच स्मोकिंग केल्याने इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या होऊ शकते. सतत स्मोकिंग केल्याने महिला आणि पुरुष दोघांचाही सेक्शुअल इंटरेस्ट कमी होऊ लागतो.
एक्सरसाईजमधून होईल फायदा
दररोज केवळ १० ते १५ मिनिटे व्यायाम केल्याने तुम्हाला या समस्येतून सुटका मिळू शकते. जर्नल ऑफ सेक्स अॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, एक्सरसाईजचा तुमच्या ऑर्गॅज्मवर चांगला प्रभाव होतो आणि इरेक्शनची समस्याही तुम्हाला येत नाही.