लैंगिक जीवन : बेडरूममधील अशा चुका ज्यांनी मूड बिघडेल, पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 03:38 PM2019-08-14T15:38:57+5:302019-08-14T15:39:54+5:30

तुम्हाला भलेही वाटत असेल की, पार्टनरसोबत तुमचं लैंगिक जीवन परफेक्ट सुरू आहे आणि कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. पण सत्य काहीतरी वेगळंच असतं.

These bedroom mistakes might ruin your sex experience stay alert | लैंगिक जीवन : बेडरूममधील अशा चुका ज्यांनी मूड बिघडेल, पण....

लैंगिक जीवन : बेडरूममधील अशा चुका ज्यांनी मूड बिघडेल, पण....

googlenewsNext

तुम्हाला भलेही वाटत असेल की, पार्टनरसोबत तुमचं लैंगिक जीवन परफेक्ट सुरू आहे आणि कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. पण सत्य काहीतरी वेगळंच असतं. अनेकदा परिस्थिती तुमच्या हाताबाहेरची असते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण बेडरूममध्ये केलेल्या अनेक कॉमन चुका असतात ज्यामुळे तुमचा किंवा तुमच्या पार्टनरचा मूड खराब होऊ शकतो. चला जाणून घेऊ अशाच काही चुका.... 

नेचर्स कॉल

तुम्हाला भलेही या गोष्टीने अनेकदा राग आला असेल, पण एक्सपर्ट सांगतात की, शारीरिक संबंधावेळी नेचर्स कॉल जाणवणे सामान्य बाब आहे. त्यांच्यानुसार, अनेक महिलांना ऑर्गॅज्मदरम्यान किंवा त्याआधी लघवीला जाण्याची इच्छा होते. कारण पेनिस्ट्रेशनमुळे त्यांच्या ब्लॅडरवर प्रेशर पडत असतं. अनेकदा तर शारीरिक संबंध आणि ऑर्गॅज्म दरम्यान ब्लॅडरवर प्रेशर पडल्याने लघवी तिथेच निघून जाते. तसेच ऑर्गॅज्मदरम्यान काहीवेळा एक द्रव्य निघतं, ज्याला लघवी समजण्याचीही चूक केली जाते.

अशात काय करावे?

शारीरिक संबंधाला सुरूवात करण्यापूर्वीच वॉशरूमला जा आणि ब्लॅडर रिकामं करून या. जेणेकरून शारीरिक संबंधावेळी ब्लॅडरवर प्रेशर येण्याची आणि लघवी लागण्याची वेळच येणार नाही. असं केल्यावरही लघवी लागली तर त्याकडे दुर्लक्ष न करता वॉशरूमला जाऊन या.

शारीरिक संबंधादरम्यान गॅस निघणे

अनेकांसोबत असं होतं की, शारीरिक संबंधावेळी अचानक गॅस सोडतात. असं काही झालं तर नक्कीच कुणाचाही मूड बिघडू शकतो. पण या नैसर्गिक गोष्टी आहेत, ज्यावर तुमचा काहीच कंट्रोल नाही. त्यामुळे याचं फार टेन्शन घेण्याची गरज नाही.

अशात काय करावे?

अशाप्रकारच्या क्षणांचा सामना करावा लागणं भलेही लाजिरवाणं असेल, पण तुमच्या पार्टनरचं जर तुमच्यावर प्रेम असेल तर या गोष्टीला एक सामान्य बाब समजून ते पुढे जातील. तुम्ही या क्षणाला एक मजेदार क्षण म्हणूनही ट्रीट करू शकता.

जेव्हा आतच राहतो कंडोम

अनेकदा असं होतं की, शारीरिक संबंधावेळी कंडोम महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्येच अडकून राहतो. काहीवेळा तो सहजपणे बाहेर काढता येतो, पण कधी कधी सहजपणे काढणं शक्य होत नाही. अशात महिलांमध्ये भीती वाढू शकते. पण घाबरण्याचं कारण नाही.

अशात काय करावे?

जर घाबरून महिलांनी प्रायव्हेट पार्ट घट्ट केला तर कंडोम काढणं अधिक कठीण होऊ शकतं. अशात जमिनीवर स्क्वॉटिंग पोजिशनमध्ये बसा आणि बोटांच्या मदतीने कंडोम बाहेर काढा. बोटांनी निघत नसेल प्रायव्हेट पार्टमध्ये दुसरी वस्तू टाकून काढण्याचा प्रयत्न करू नका. कंडोम काढणं अशक्य झालं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: These bedroom mistakes might ruin your sex experience stay alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.