लैंगिक जीवन : पॉर्न सिनेमात जे असतं, ते खऱ्या आयुष्यात नसतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:16 PM2018-12-18T14:16:04+5:302018-12-18T14:18:51+5:30
अनेकदा लोक खऱ्या आयुष्यातील लैंगिक जीवनाची आणि पॉर्न सिनेमांची तुलना करतात. पण मुळात लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, शारीरिक संबंध ही गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्या वेगळ्या अनुभवासाठी वेगळ्या गोष्टीही कराव्या लागतात.
अनेकदा लोक खऱ्या आयुष्यातील लैंगिक जीवनाची आणि पॉर्न सिनेमांची तुलना करतात. पण मुळात लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, शारीरिक संबंध ही गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्या वेगळ्या अनुभवासाठी वेगळ्या गोष्टीही कराव्या लागतात. पण पॉर्न सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी खऱ्या आयुष्यात होत नसतात.
या सिनेमांमध्ये अशा काही लैंगिक क्रिया दाखवल्या जातात ज्या खऱ्या आयुष्यात शक्यच होऊ शकत नाहीत. त्यामुळे लोकांनी यावर विश्वास ठेवून आणि तसं काही करण्याचा प्रयत्न करुन निराश न होता स्वत:च्या लैंगिक जीवनावर लक्ष द्यावं. कारण ते बघून आनंद मिळवणे वेगळं आणि तसंच करायला बघणं हे वेगळं आहे. तसंच करण्याच्या नादात तुम्ही तुमचं वाईट करुन घेऊ नका.
सतत शारीरिक संबंधाची इच्छा
जर तुम्ही कधी पॉर्न सिनेमे पाहिले असतील तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की, त्यातील लोक हे सतत केवळ शारीरिक संबंधासाठी भुकेलेले दाखवले जातात. पण खऱ्या आयुष्यात तसं नसतं. त्यामुळे यावर विश्वास ठेवून तुम्ही स्वत:वरील विश्वास गमावून बसाल.
काल्पनिक बॉडी इमेज
या पॉर्न सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची अशी बॉडी दाखवली जाते, जी खऱ्या आयुष्यात सर्वांचीच असू शकत नाही. ते पाहून त्या कलाकारांसारखी आपलीही बॉडी का नाही? असा विचार करुन अनेकजण निराश होतात. याने अनेकांमध्ये न्यूनगंड येतो. त्यामुळे या पॉर्न सिनेमांसोबत स्वत:ची तुलना करु नका. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, चांगल्या लैंगिक आनंदासाठी केवळ चांगल्या बॉडीचीच गरज नसते.
प्रत्येकवेळी परमोच्च आनंद
प्रत्येकवेळी महिलांना परमोच्च आनंद मिळेल असं वास्तवात शक्य नाहीये. परमोच्च आनंद हा तुमचा मूड आणि परिस्थितींवर निर्भर असतो. पण पॉर्न सिनेमांमध्ये दाखवले जाते की, कलाकार नेहमीच परमोच्च सूख मिळवतात. पण खऱ्या आयुष्यात प्रत्येकवेळी असं नसतं. त्यामुळे असं होत नसल्यानेही अनेकांना निराशा येऊ शकते.
तासंतास चालणारी क्रिया
एक सामान्य शारीरिक संबंधाची क्रिया फोरप्ले वगळून ही सरासरी १५ मिनिटे असते. मात्र पॉर्न सिनेमांमध्ये ३०-३० मिनिटे ही क्रिया केल्याचे दाखवले जाते. पण वास्तवात असं होत नसतं. पॉर्न सिनेमांचे वेगवेगळे दृश्य एकत्र करुन दाखवले जातात. त्यामुळे तुम्हीही ३० मिनिटांची लैंगिक क्रिया का होत नाही? असा विचार करत असाल तर हा विचार चुकीचा आहे. असे करण्याचाही तुम्ही प्रयत्नही केला तर तुम्हाला महागात पडू शकतं.
अशक्य टेक्निक
या सिनेमांमध्ये कलाकारांना वेगवेगळ्या विचित्र क्रिया करताना दाखवले जाते. त्यांची आक्रामकता अधिक वाढवून दाखवली जाते. पण ते केवळ तुमच्या मनोरंजनासाठी केलं जातं. हे तुम्ही खऱ्या आयुष्यात करण्याचा चुकूनही प्रयत्न करु नका. याने तुम्हा दोघांनाही वेगवेगळ्या आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात. खरंतर हा वैयक्तित आवडीचा मुद्दा आहे. जबरदस्तीने असं काही करुन नातं अडचणीत आणू नका.