लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे महिलांना मिळत नाही परमोच्च आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 03:46 PM2019-07-09T15:46:21+5:302019-07-09T15:50:01+5:30
नुकत्याच झालेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, ८५ टक्के महिलांना शारिरिक संबंधावेळी ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नाही.
नुकत्याच झालेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, ८५ टक्के महिलांना शारिरिक संबंधावेळी ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नाही. त्यामुळे शारीरिक संबंध हा त्यांच्यासाठी आनंदाची नाही तर दबावाची एक गोष्ट बनून राहते. काही महिला पार्टनरला संतुष्ट करण्यासाठी फेक ऑर्गॅज्मचं नाटक करतात. पण याला परिपूर्ण शारीरिक संबंध म्हणता येत नाही. अशात लैंगिक जीवनात तुम्हाला ऑर्गॅज्ममध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या कारणांबाबत माहिती असलं पाहिजे.
औषधांचं सेवन केल्याने
औषधांचं अधिक सेवन केल्याने शरीरात प्रोलॅक्टिनचं प्रमाण वाढतं. हे एक असं प्रोटीन आहे, ज्याने कामेच्छा घटते. त्यामुळे ऑर्गॅज्मचा अनुभव मिळण्यास अडचण जाते. रक्तदाब, अॅंटी-डिप्रेसेंट्स आणि बर्थ कंट्रोल पिल्सचा सुद्धा लैंगिक क्षमतेवर प्रभाव पडतो आणि यामुळे योनीची शुष्कता वाढते. ज्यामुळे शारीरिक संबंधावेळी वेदना होतात आणि ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नाही.
संबंधाचा दबाव
जेव्हा तुमचं शरीर तुमच्या पार्टनरच्या संपर्कात येतं, तेव्हा यादरम्यान शरीरात सेन्सेशन होतात. ज्यामुळे योनीत ओलावा येतो आणि श्वास अधिक वेगाने तुम्ही घेऊ लागता. त्याचवेळी तुम्ही वेगवेगळे आवाजही काढू लागता. पण जेव्हा असं होत नसेल तर शारीरिक संबंध ठेवूनही तुम्हाला ऑर्गॅज्मचा आनंद मिळणं कठीण होऊन बसतं.
पुरेसं पाणी न पिणे
दिवसभर पाणी पित राहिल्याने थकवा, पोटाच्या समस्यांपासून बचाव होतो. तसेच पाण्यामुळेच तुम्ही बेडरूममध्येही चांगलं परफॉर्म करू शकता. डॉक्टरांचं मत आहे की, ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तेजना वाढवणारे टिश्यू जे पुढे दुसऱ्या टिश्यूजना जुळलेले असतात, त्यांना पुढे जाण्यासाठी मुलायम असं काही हवं असतं. तरल पदार्थांच्या अभावामुळे हे टिश्यू चिकट होऊ शकत नाहीत, त्यामुळे ऑर्गॅज्मचा आनंद मिळत नाही.
उंच टाचेची सॅंडल
आजकाल जास्तीत जास्त महिला उंच टाचेच्या सॅंडल वापरणं पसंत करतात. वास्तवात हाय हिल्स सॅंडल घालून चालल्याने पायांमध्ये वेदना होतात, ज्यामुळे पेल्विक फ्लोर आणि याच्याशी संबंधित अंगांच्या मांसपेशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. ज्यामुळे ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नाही.
काय कराल उपाय?
ही एक अशी समस्या आहे ज्याने जास्तीत जास्त महिला ग्रस्त आहेत. पण यात फार चिंता करण्याची गरज नसते.लैंगिक विषयाची कमी माहिती आणि खराब जीवनशैलीसहीत इतरही काही कारणांमुळे अशी समस्या निर्माण होते. ही समस्या बरी केली जाऊ शकते.
ऑर्गॅज्मचा अनुभव करू न शकणाऱ्या महिलांना डॉक्टर हे जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करतात की, त्यांनी त्यांच्या पार्टनरला सांगावं की, त्यांना कुठे स्पर्श केल्यावर त्यांची उत्तेजना वाढते. तसेच psychologist थेरपी भीती, कमजोरी आणि पार्टनरवरील विश्वास या समस्या दूर करण्यासाठी दिली जाते. सोबतच काही तज्ज्ञ एक्सरसाइजही करण्यास सांगतात.