लैंगिक जीवनावर वाईट परिणाम करतात घरातील 'या' ४ गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 05:11 PM2019-01-21T17:11:15+5:302019-01-21T17:11:19+5:30
शारीरिक संबंध वैवाहिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पण अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी काही लोकांमध्ये कामेच्छा कमी होत गेलेली बघायला मिळते.
शारीरिक संबंध वैवाहिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पण अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी काही लोकांमध्ये कामेच्छा कमी होत गेलेली बघायला मिळते. स्ट्रेस, टेन्शन आणि बदलती लाइफस्टाइल या गोष्टी यासाठी कारणीभूत धरल्या जातात. पण कामेच्छा कमी होण्याला केवळ याच गोष्टी कारणीभूत नसतात. आणखीही काही गोष्टी आहेत ज्यामुळे कामेच्छा कमी होते. चला जाणून घेऊ त्या काय आहेत....
कॉफी
जर तुम्ही कॉफीचे शौकीन असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण यात कामेच्छा किंवा शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता कमी होण्याचं हे एक मुख्य कारण आहे. तज्ज्ञ सांगतात की, कॉफी प्यायल्याने तुमची एनर्जी तर वाढते, मात्र याच्या अधिक सेवनामुळे तुमच्या लैंगिक जीवनात अडचण येऊ शकते. जास्त कॉफी प्यायल्याने अड्रीनल ग्लॅन्ड ओव्हर फंक्शन करु लागतात आणि याने स्ट्रेस हार्मोन्स जास्त रिलीज होतात. याच हार्मोन्समुळे कामेच्छा कमी होते.
गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर औषधे
गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर औषधांमुळेही कामेच्छा कमी होते. जेव्हा तुम्ही आजार असता तेव्हा वेगवेगळ्या औषधांचा आधार घेता. पण या औषधांमुळे कामेच्छा कमी होते. याने लैंगिक जीवनात वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
लूक्स आणि फिगरची चिंता
अनेक महिला त्यांच्या लूक्स आणि फिगरबाबत फार कॉन्शस असतात. अनेकदा पाहिलं गेलंय की, महिला स्वत:ला आरशात बघत असतात. फिगर आणि फीचर्स त्या बघतात आणि ते मनासारखे नसेल तर त्यांना टेन्शन येतं. तज्ज्ञ सांगतात की, अशा महिला शारीरिक संबंध ठेवतानाही जज करणाऱ्या त्या विचारांमध्ये असतात. ज्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं. याने हळूहळू त्यांची कामेच्छा कमी होऊ लागते.
घरातील कार्पेट किंवा फूड इंक
यावर तुमचा विश्वास नसेल पण हे खरं आहे की, घरातील कार्पेटचाही लैंगिक जीवनावर वाईट प्रभाव पडतो. तज्ज्ञ सांगतात की, घरातील अनेक वस्तूंमध्ये टॉक्सिन्सची एन्ट्री होते. यात पेपर इंकपासून ते पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांचा आणि फायबरचाही समावेश आहे. यात असलेले केमिकल्स श्वासाद्वारे शरीरात पोहोचतात आणि याने हार्मोन्समध्ये बिघाड होतो.