लैंगिक जीवन : 'या' रोजच्या सवयींमुळे घटते पुरूषांच्या शुक्राणूंची संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 04:28 PM2019-09-02T16:28:58+5:302019-09-02T16:41:39+5:30
जर एखाद्या व्यक्तीत शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा त्याच्या शुक्राणूंची गुणवत्ता खराब असेल या गोष्टीने त्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन प्रभावित होऊ शकतं.
(Image Credit : tamarahealthcare.com)
कोणत्याही पुरूषाची फर्टिलिटी सामान्यपणे त्या पुरूषाच्या स्पर्म काउंटवर निर्भर असते. जर एखाद्या व्यक्तीत शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा त्याच्या शुक्राणूंची गुणवत्ता खराब असेल या गोष्टीने त्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन प्रभावित होऊ शकतं. पुरूषांमध्ये इन्फर्टिलिटीच्या समस्येचं मुख्य कारण शुक्राणूंची संख्या कमी असणं असू शकतं.
(Image Credit : blog.docsapp.in)
पुरूषांमध्ये शुक्राणूंची योग्य प्रमाणात निर्मिती न होणं याला वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, ड्रग्सचं सेवन, मसल्स वाढवण्यासाठी सप्लीमेंट्सचं सेवन करणे, अल्कोहोलचं अधिक सेवन आणि आहार व्यवस्थित न घेणे. अशाच काही रोजच्या सवयींमुळे पुरूषात शुक्राणूंची संख्या कमी करू शकतात.
अधिक प्रमाणात पनीरचं सेवन
(Image Credit : boldsky.com)
२०१४ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, पनीरचं अधिक सेवन केल्याने पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. खासकरून ते लोक जे धुम्रपान करतात किंवा आधी करत होते. मात्र, दुधाने स्पर्म काउंटमध्ये वाढ होऊ शकते.
फार जास्त गोड पेय पदार्थ
(Image Credit : manchestereveningnews.co.uk)
फार जास्त गोड पेय पदार्थांचं सेवन केल्यानेही तुमच्या शुक्राणूंच्या संख्येसाठी नुकसानकारक ठरू शकतं. जास्त गोड पेयांचं सेवन केल्याने खासकरून त्या लोकांच्या शुक्राणूंची संख्या अधिक कमी होते, जे लोक सडपातळ असतात. सोबतच या पेयांचं अधिक सेवन केल्याने फॉलिकल स्टीमुलेटिंग हार्मोन(एफएसएच)ची प्रमाणही घटतं. हा हार्मोन स्पर्मची निर्मितीसाठी फायदेशीर असतो.
गरम पाण्याने आंघोळ करणे
(Image Credit : maggiescarf.com)
फार जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने शुक्राणूंची संख्या आणि निर्मिती यावर नकारात्मक प्रभाव पडतो. कारण यामुळे टेस्टिकल (अंडकोष)चं तापमान वाढतं. त्यामुळे स्पर्म काउंटवर वाईच प्रभाव पडतो. प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करावा.
अधिक टीव्ही बघणे
(Image Credit : dailymail.co.uk)
जर टीव्ही बघणे तुमची आवड असेल तर याकडे तुम्ही गंभीरतेने विचार करणे गरजेचं आहे. एका रिसर्चनुसार, जे पुरूष २० तासांपेक्षा अधिक वेळ टीव्ही बघतात त्यांच्यात शुक्राणूंची संख्या इतरांच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी कमी असते.
सोयाचं अधिक सेवन
२००८ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, सोयाचं अधिक सेवन केल्याने शुक्राणूंची निर्मिती आणि गुणवत्तेवर नकारात्मक प्रभाव पडतो. खासकरून जे लोक लठ्ठपणाचे शिकार आहेत आणि सोयाचं अधिक सेवन करत असतील तर त्यांच्या शुक्राणूंच्या संख्येवर वाईट प्रभाव पडू शकतो.
(टिप : वरील उपाय हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. तुम्हाला काहीही समस्या असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानेच काही उपाय केल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल.)