लैंगिक जीवन : 'हे' असू शकतात अ‍ॅलर्जीचे संकेत, वेळीच करा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 02:46 PM2019-11-08T14:46:32+5:302019-11-08T14:46:49+5:30

शारीरिक संबंधाने दोन व्यक्ती केवळ शारीरिक रूपाने जवळ येत नाही तर मानसिक आणि भावनात्कम रूपानेही जवळ येतात. याने दोन व्यक्तींमध्ये जवळीकता निर्माण होण्यास मदत मिळते.

These signs tell that you are having sex allergy | लैंगिक जीवन : 'हे' असू शकतात अ‍ॅलर्जीचे संकेत, वेळीच करा उपाय!

लैंगिक जीवन : 'हे' असू शकतात अ‍ॅलर्जीचे संकेत, वेळीच करा उपाय!

googlenewsNext

शारीरिक संबंधाने दोन व्यक्ती केवळ शारीरिक रूपाने जवळ येत नाही तर मानसिक आणि भावनात्कम रूपानेही जवळ येतात. याने दोन व्यक्तींमध्ये जवळीकता निर्माण होण्यास मदत मिळते. असं असलं तरी शारीरिक संबंधामुळेही अनेकदा नात्याला नुकसान पोहोचू शकतं. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण सेक्स अ‍ॅलर्जी एक कॉमन समस्या आहे. अनेकदा समस्या तुमच्यात नाही तर पार्टनरमध्येही असू शकते. ज्याचं रिअ‍ॅक्शन शरीरावर बघायला मिळतं. आम्ही तुम्हाला अशा काही संकेतांबाबत सांगणार आहोत, ज्यावरून तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुम्हाला सेक्सपासून अ‍ॅलर्जी आहे की नाही.

श्वासाशी संबंधित समस्या

शारीरिक संबंधावेळी वेगवेगळे आवाज काढणं एक संतुष्टी व्यक्त करण्याचं माध्यम आहे. पण जर शारीरिक संबंधादरम्यान किंवा नंतर तुम्हाला धाप लागत असेल, श्वास घेण्यास अडचण येत असेल, श्वास भरून आला असेल तर ही समस्या गंभीर असू शकते. अशावेळी लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा.

खाज येत असेल...

हे गरजेचं नाही की, प्रत्येकवेळी होणारी खाजेची समस्या ही व्हजायनल इन्फेक्शनशी संबंधित असेल. पार्टनरच्या सीमेनमुळेही तुम्हाला अ‍ॅलर्जी असू शकते आणि या कारणेही खाज येऊ शकते. जर शारीरिक संबंधानंतर खाजेची समस्या होत असेल आणि कोणत्या प्रकारचं डिस्चार्जही होत नसेल तर यासाठी तुम्ही नाही तर तुमचा पार्टनर जबाबदार असू शकतो.

कंडोम विना संबंध ठेवले तर

जर तुम्हाला कंडोमचा वापर न करता संबंध ठेवत असाल किंवा कंडोममधून पार्टनरचं सीमेन बाहेर आल्यावर त्याने तुम्हाला खाज येत असेल तर तुमची त्वचा सीमेन प्रति फार संवेदनशील आहे. याप्रकारची समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय असू शकतात. यासाठी शारीरिक संबंध ठेवणं बंद करण्याची गरज नाही. तुमच्या डॉक्टरला भेटा आणि यावर उपाय करा. 

सूज आणि रॅशेज

जर तुम्हाला शारीरिक संबंधानंतर व्हजायनात सूज किंवा रॅशेज दिसत असतील तर याचा अर्थ आहे की, व्हजायना सीमेनबाबत फार जास्त संवेदनशील आहे आणि तुम्हाला याची अ‍ॅलर्जी आहे. हे सुरूवातीला एखाद्या साधारण अ‍ॅलर्जीसारखं वाटतं, पण याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे.


Web Title: These signs tell that you are having sex allergy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.