लैंगिक जीवनः 'या' सवयी बदला; अन्यथा शुक्राणूंची संख्या घटेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 04:43 PM2018-11-01T16:43:45+5:302018-11-01T16:44:25+5:30

आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टइलमध्ये अनेक पुरुषांना वेगवेगळ्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Things that lower your sperm count | लैंगिक जीवनः 'या' सवयी बदला; अन्यथा शुक्राणूंची संख्या घटेल!

लैंगिक जीवनः 'या' सवयी बदला; अन्यथा शुक्राणूंची संख्या घटेल!

Next

आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टइलमध्ये अनेक पुरुषांना वेगवेगळ्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या आजारांचा लैंगिक जीवनावर फारच वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे पती-पत्नी तणावातही येतात. स्पर्म काउंट म्हणजेच शुक्राणूंची संख्या कमी असणे आणि त्यामुळे गर्भधारणा न होणे, लैंगिक क्षमता नसणे या समस्या अलिकडे फारच भेडसावत आहे. 

जसं जसं वय वाढतं तसतसा टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होतो. ही तशी सामान्य बाब मानली जाते. पण अलिकडे कमी वयातही शुक्राणूंची संख्या कामी होणे ही गंभीर बाब होत आहे. आणि मेल हार्मोनमध्ये कमतरता आल्याने वेगवेगळ्या आजारांचाही सामना करावा लागतो. 
टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे केवळ डायबिटीज, हृदयरोग आणि थकवा याच समस्या नाही तर कामेच्छा कमी असणे ही सुद्धा समस्या निर्माण होते. तुमच्या शरीरातील शुक्राणूंचं प्रमाण कमी असल्याचं केवळ एका सामान्य रक्ताच्या चाचणीतून माहिती करुन घेता येतं. पण त्यासोबतच जर तुम्ही तुमच्या काही सवयी सुधारल्या तर तुम्हाला ही समस्या होणारच नाही. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या सवयी ज्यामुळे तुमच्या शुक्राणूंमध्ये कमतरता येते.

गरम पाण्याने आंघोळ

भलेही गरम पाण्याने आंघोळ केल्यावर तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल पण याने शुक्राणूंची संख्या कमी होते. कारण शुक्राणु जास्त तापमान सहन करु शकत नाही. त्यामुळे ते नष्ट होऊ लागतात. 

टाईट अंडरवेअर

अनेकजण फार जास्त टाईट असलेल्या अंडरवेअरचा वापर करातत. त्यामुळे शरीरातील अंडकोषाचं तापमान वाढतं. याने शुक्राणूंचं नुकसान होतं. त्यामुळे सैल अंडरवेअर वापरण्यास सुरुवात करा. 

मोबाइल फोन

जे लोक मोबाइल दिवसभर पॅंटच्या खिशात मोबाइल ठेवून फिरतात त्यांची वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण मोबाइलमधून निघणारे रेडिएशन पुरुषांच्या शुक्राणूंवर फार जास्त प्रभाव पडतो.

जास्त स्ट्रेस

जास्त मानसिक तणाव घेतल्याने पुरुषांच्या टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होतो. याचा थेट प्रभाव त्यांच्या लैंगिक जीवनावर पडतो. त्यामुळे तणावाला दूर ठेवण्यासाठी जमेल ते प्रयत्न करा.

मद्यसेवन

अधिक प्रमाणात मद्यसेवन केल्याने पुरुषांची कामेच्छा तर कमी होतेच. सोबतच शुक्राणूंची संख्याही घटते. त्यामुळे मद्यसेवन न करणे हाच उपाय आहे. 

स्मोकिंग

जे लोक सतत सिगारेट ओढतात त्यांनीही वेळीच सावध होणे गरजेचे आहे. याने शरीरातील कॅडमियम डीएनएला इजा होते आणि त्या कारणाने शुक्राणूंची संख्या कमी होते.

Web Title: Things that lower your sperm count

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.