लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूषांनी आवर्जून कराव्यात 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 04:16 PM2019-07-05T16:16:25+5:302019-07-05T16:20:13+5:30

शारीरिक संबंधावेळी बेडवर नेमकं काय करावं हे प्रत्येक पुरूषाला माहीत असतं. पण शारीरिक संबंधानंतर काय करावं हे तुम्हाला माहीत आहे का?

Things that men should always do after sex | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूषांनी आवर्जून कराव्यात 'या' गोष्टी!

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूषांनी आवर्जून कराव्यात 'या' गोष्टी!

Next

शारीरिक संबंधावेळी बेडवर नेमकं काय करावं हे प्रत्येक पुरूषाला माहीत असतं. पण शारीरिक संबंधानंतर काय करावं हे तुम्हाला माहीत आहे का? शारीरिक संबंधाच्या आधी आणि लैंगिक क्रिया जेवढी महत्त्वाची असते, तेवढीच ती शारीरिक संबंधानंतरही असते. शारीरिक संबंधानंतर पुरूषांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काही पुरूषांना शारीरिक संबंधानंतर काय करावं हे माहीत नसतं. ज्यामुळे त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागतो.

मग या समस्या संक्रमणाच्या असोत वा एनर्जी कमजोरमुळे किंवा महिला पार्टनरबाबत बेजबाबदारपणा संबंधी असतात. पण या समस्यामुळे लैंगिक जीवनातील आनंद कमी होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार ज्यामुळे पुरूष त्यांचं लैंगिक जीवन इंटरेस्टींग करू शकतील.

स्वच्छतेवर द्या लक्ष

लैंगिक जीवन एन्जॉय करण्यासाठी स्वच्छतेवर लक्ष देणंही गरजेचं आहे. स्वच्छतेचा अभाव असेल तर वेगवेगळ्या संक्रमणांना तुम्ही निमंत्रण देऊ शकता. कंडोमशिवाय संबंध ठेवणार असाल तर पुरूषांनी प्रायव्हेट पार्टची चांगली स्वच्छता करावी. असं न केल्यास समस्या होऊ शकते. 

लघवी जरूर करावी

शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर महिला लघवी करून येतात. कारण अनेक महिलांना हे माहीत असतं की, असं न केल्यास यूटीआयची समस्या होऊ शकते. पण पुरूषांमध्ये ही सवय सामान्य नाहीये. जर तुम्ही शारीरिक संबंधानंतर लघवी करत नसाल किंवा प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करत नसाल तर दोघांनाही संक्रमणाचा धोका होऊ शकतो.

पाण्याचं अधिक सेवन

शारीरिक संबंधावेळी शरीरातील रक्तप्रवाह वाढतो, अशात पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे प्रायव्हेट पार्टमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी पुरेसं पाणी प्यावं. तसेच शरीराची उष्णताही पाणी प्यायल्याने कमी होते.

झोप

शारीरिक संबंधानंतर शरीरातून वॅसोप्रेसिन नावाचं हार्मोन रिलीज होतात, जे रक्तवाहिन्यांना मजबूत करतात. हे हार्मोन्स मेंदुत रिलीज होऊ शरीराला आराम करण्याचा संदेश देतात. याने पुन्हा एकदा शरीर नॉर्मल होतं. त्यामुळे झोप महत्त्वाची ठरते.

Web Title: Things that men should always do after sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.