शारीरिक संबंधाआधी चुकूनही करु नका 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 05:00 PM2018-11-27T17:00:54+5:302018-11-27T17:01:18+5:30

शारीरिक संबंधाबाबत लोकांमध्ये नेहमीच माहितीचा अभाव जाणवतो. अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा लैंगिक जीवनावर फार वाईट प्रभाव पडतो.

Things women should never do before sex | शारीरिक संबंधाआधी चुकूनही करु नका 'या' गोष्टी!

शारीरिक संबंधाआधी चुकूनही करु नका 'या' गोष्टी!

googlenewsNext

(Image Credit : www.irishtimes.com)

शारीरिक संबंधाबाबत लोकांमध्ये नेहमीच माहितीचा अभाव जाणवतो. अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा लैंगिक जीवनावर फार वाईट प्रभाव पडतो. पण लोकांना याबाबत माहितीच नसते. लैंगिक जीवन हे एका दिवसापूरतं मर्यादित नाहीये, त्यामुळे याबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. खासकरुन महिलांनी लैंगिक जीवनाबाबत नेहमीच सतर्क रहायला हवं. जर महिलांनी याबाबत सतर्कता दाखवली तर लैंगिक जीवन आणखी चांगलं होण्यास मदत होईल. अशाच काही गोष्टी आम्ही सांगत आहोत, ज्या शारीरिक संबंध ठेवण्याआधी टाळायला हव्यात. कारण या गोष्टींचा तुमच्या लैंगिक जीवनावर वाईट प्रभाव पडू शकतो. 

जास्त पाणी किंवा मद्यसेवन

कमी प्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने व्यक्तीची कामेच्छा वाढण्यास मदत होते, असं अनेक शोधांमधून समोर आलं आहे. पण अल्कोहोलचं प्रमाण जास्त झालं तर याने उत्तेजना कमी होते. तज्ज्ञ सांगतात की, खासकरुन जास्त मद्यसेवन केल्याने रक्तवाहिन्या पसरट होतात आणि यामुळे परमोच्च आनंद मिळण्यास अडचण येते.  तर जास्त पाणी प्यायल्याने लैंगिक क्रिया करण्यास अडचण येऊ शकते.

जड आहार

शारीरिक संबंध ठेवण्याच्या काही वेळेआधी खूप जास्त जेवण केल्याने झोप येऊ लागते. जास्त खाल्ल्याने पचनक्रियेमध्ये इन्सुलिन जास्त रिलीज होतं आणि मेंदूमध्ये सेरोटोनिन व मेलाटोनिन वाढतं. याने झोप लवकर येते आणि त्यामुळे शारीरिक संबंधातील इच्छा कमी होते. 

अॅंटी-एलर्जिक औषधं

फिटनेसची काळजी घेणे गरजेचे आहेच. पण शारीरिक संबंध ठेवण्याआधी कोणतंही अॅंटी-एलर्जिक औषध घेऊ नका. कारण याने शरीरातील Mucus कोरडं होतं. या कारणाने गुप्तांगातील ओलावा कमी नाहीसा होतो. याचा थेट प्रभाव लैंगिक क्रियेवर पडतो. 

शेविंग करु नका

शरीराची काळजी घेणे महत्त्वाचं आहे. याबाबत महिला अधिक जागरुक असतात. पण शारीरिक संबंध ठेवण्याच्या काही वेळेआधी शेविंग कराल याने तुम्हाला अडचण होऊ शकते. कारण शेव्हिंग केल्यावर त्वचा फार जास्त संवेदनशील होते. जर तुम्हाला शेविंग करायचं असेलच तर दोन-तीन दिवसाआधी करावं. 

फोरप्लेसाठी फळ-भाज्या

चॉकलेट सॉस किंवा स्ट्रॉबेरी जेली यांसोबत लैंगिक खेळ फार रोमांचक आणि आनंददायी अनुभव ठरु शकतो. पण शारीरिक संबंधानंतर याने तुम्हाला यीस्ट इन्फेक्शनचा धोका वाढतो. लुब्रिकंट म्हणून याचा वापर केल्यास तुम्हाला वेगवेगळ्या इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो. 
 

Web Title: Things women should never do before sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.