लैंगिक जीवन: क्लायमॅक्सनंतर काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 04:13 PM2018-11-15T16:13:51+5:302018-11-15T16:14:37+5:30
ज्याप्रकारे शारीरिक संबंध ठेवण्याआधी पती-पत्नी दोघांमध्येही उत्तेजना आणि उत्साह वाढवण्यासाठी फोरप्ले गरजेचा असतो.
(Image Credit : AccessRx.com)
ज्याप्रकारे शारीरिक संबंध ठेवण्याआधी पती-पत्नी दोघांमध्येही उत्तेजना आणि उत्साह वाढवण्यासाठी फोरप्ले गरजेचा असतो. त्याचप्रमाणे शारीरिक संबंध ठेवून झाल्यावरही फोरप्ले कायम ठेवण्याची गरज असते. याचा तुमच्या नात्यावर भावनिक दृष्टीने खोलवर सकारात्मक प्रभाव पडतो. जर शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर थेट उठून गेलात आणि जोडीदाराला लगेच दूर केलं तर याने दोघांमधील नातं घट्ट होत नाही. त्यामुळे पोस्ट सेक्स म्हणजेच शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर काय करायला हवे...
स्वच्छता
अनेकदा असही होतं की, शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर जोडीदाराला तुम्हाला मिठीत ठेवण्याची इच्छा होत असेल. पण त्याआधी गरजेचं आहे ती स्वच्छता. दोघांनीही सर्वातआधी स्वच्छता करावी. महिलांनी शारीरिक संबंधांनंतर १५ मिनिटांच्या आत लघवीला जावे. जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारचं संक्रमण होऊ नये. तसेच यूटीआयचा धोका टाळण्यासाठीही हे गरजेचं असतं. त्यानंतर महिलांनी आपल्या गुप्तांगाची एखाद्या सौम्य साबणाने किंवा वॉश क्रीमने स्वच्छता करावी. त्यानंतर हवं तर तुम्ही शरीराला हायड्रेट करण्यासाठी १ ग्लास पाणी किंवा नारळाचं पाणी पिऊ शकता.
जवळ घेणे
दोघांचीही स्वच्छता झाली असेल तर दोघांनीही एकमेकांना जवळ घेणे अपेक्षित असतं. जोडीदारासोबत भावनिकदृष्या जवळ येण्याचा आणि त्यांना ही जाणीव करुन देण्याचा की, तू माझ्यासाठी किती स्पेशल आहे, याचा सर्वात चांगला पर्याय आहे. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काही वेळासाठी दोन शरीरांचा संपर्क हा जोडीदारासोबत नातं घट्ट करण्याची पद्धत आहे. भलेही तुम्हाला कितीही झोप आली असेल पण जोडीदाराला काही वेळासाठी जवळ घेणे गरजेचे आहे.
संवाद
जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला जोडीदारासोबत बोलण्याचा वेळच मिळत नाही. अशावेळी हा बोलण्याची योग्य वेळ आहे. मग त्यात विषय कोणताही असो, त्यात तुम्ही लैगिक जीवनाबाबत गप्पा करु शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही विषयावर गप्पा करु शकता. या गप्पाही दोघांनी जवळ आणण्यासाठी आणि एकमेकांप्रति सन्मान वाढवण्यासाठी फायद्याच्या ठरतात.