लैंगिक जीवन : महिला आणि पुरूषांची उत्तेजित होण्याची वेळ वेगवेगळी, म्हणून तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 04:02 PM2019-09-27T16:02:35+5:302019-09-27T16:06:48+5:30
तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर कमी शारीरिक संबंध ठेवतो आणि याचं कारण वेळही असू शकते. चला जाणून घेऊ या सर्व्हेतून समोर आलेल्या आश्चर्यजनक गोष्टी...
एक सर्व्हेतून एक आश्चर्यजनक आणि तेवढीच सत्य बाब समोर आली आहे. महिला आणि पुरूष वेगवेगळ्या वेळेला सेक्शुअली अॅक्टिव फील करतात म्हणजे त्यांची शारीरिक संबंधाची इच्छा वेगवेगळ्या वेळी जागृत होते, असे या सर्व्हेतून समोर आले आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर कमी शारीरिक संबंध ठेवतो आणि याचं कारण वेळही असू शकते. चला जाणून घेऊ या सर्व्हेतून समोर आलेल्या आश्चर्यजनक गोष्टी...
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये २३०० अॅडल्ट्सने सहभाग घेतला होता. साधारण ७० टक्के महिलांनी सांगितले की, त्यांची आणि त्यांच्या पार्टनरची सेक्स ड्राइव्ह मॅच करत नाही. कारण दोघेही वेगवेगळ्या वेळेला उत्तेजित होते. याचं मुख्य कारण म्हणजे महिला आणि पुरूषांच्या वेगवेगळ्या हार्मोन सायकलमुळे होतं.
पुरूषांनी सांगितले की, सकाळी ६ ते ९ वाजता दरम्यान शारीरिक संबंध ठेवून त्यांची दिवसाची सुरूवात करायची इच्छा असते. तेच महिलांनी सांगितले की, त्यांना रात्री ११ ते २ वाजता दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा जागृत होते. एकंदर बघायला गेलं तर पुरूष सर्वात जास्त सकाळी ७.४५ वाजता दरम्यान जास्त उत्तेजित होतात तर महिला सर्वात जास्त रात्री ११.२१ वाजता अधिक उत्तेजित होतात.
सकाळी पुरूषांची टेस्टोस्टेरॉन लेव्हल हाय असते. तर महिलांमधील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण हळूहळू वाढतं. पण त्यांच्या टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढणं हे त्यांच्या मासिक पाळीवरही अवलंबून असतं. पण वेगवेगळ्या शेड्यूलमुळे लैंगिक जीवना निरस होऊ नये. एक्सपर्ट सांगतात की, महिला फ्लेक्सिबल असतात तर पुरूषांची इच्छा थेट वेळेवर आधारित असते. महिलांच्या सेक्स ड्राइव्हवर वेळेशिवाय आणखीही काही गोष्टींचा प्रभाव पडतो.
सर्व्हेनुसार, महिलांची कामेच्छा फार कॉम्प्लेक्स असते, जास्त सायकॉलॉजिकल असते. याचा त्यांच्या पार्टनरसोबत काही देणं-घेणं नसतं. त्यांच्यात जर त्यांना चांगला आत्मविश्वास जाणवत असेल आणि उत्तेजित होत असतील तर त्या अधिक निसंकोचपणे शारीरिक संबंधाला समोरे जातील आणि अशावेळी त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव होण्याचीही शक्यता अधिक असते, मग वेळ कोणतीही असो.
तुम्ही कितीवेळा शारीरिक संबंध ठेवता किंवा ठेवत नाही, याचा गिल्ट सोडून देऊनही एका चांगल्या लैंगिक जीवनाचा मार्द मिळू शकतो. अनेकदा महिलांची शारीरिक संबंधाची इच्छा तोपर्यंत होत नाही, जोपर्यंत पार्टनरसोबत फोरप्ले सुरू होत नाही. अशात कोण काय सांगतं याचा विचार करू नका. तुमचं मन काय म्हणतं ते करा. मग दिवसाचे १२ वाजले असो वा रात्रीचे १२.