लैंगिक जीवन : काही दिवस 'त्याचा' ब्रेक घेतला तर काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:14 PM2018-11-07T16:14:23+5:302018-11-07T16:15:41+5:30
जर पती-पत्नीच्या नात्यात नियमीतपणे शारीरिक संबंध न ठेवणे ही समस्या असू शकते तर शीरीरिक संबंध जास्त ठेवणेही गंभीर समस्यांचं कारण ठरु शकतं.
(Image Credit : The Asian Age)
जर पती-पत्नीच्या नात्यात नियमीतपणे शारीरिक संबंध न ठेवणे ही समस्या असू शकते तर शीरीरिक संबंध जास्त ठेवणेही गंभीर समस्यांचं कारण ठरु शकतं. तज्ज्ञांनुसार, अनेक जोडपी चांगला लैंगिक अनुभव घेण्याच्या दृष्टीने शारीरिक संबंधांतून ब्रेक घेण्याचा विचार करतात.
शारीरिक संबंधात ब्रेक घेऊन अधिक जवळ येण्याचा हा उद्देश असतो. पण शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आतुरता असतानाही शारीरिक संबंध न ठेवणं हे एखादं कोडं अनेकांना वाटू शकतं. पण सेक्स डीटॉक्स म्हणजेच इच्छा असूनही काही दिवसांसाठी शारीरिक संबंध न ठेवणं तुमच्या नात्यासाठी फायदेशीर ठरु शकतं.
उत्सुकता आणि अस्वस्थता कमी होईल
शारीरिक संबंधातून काही दिवसांसाठी ब्रेक घेतल्यास शारीरिक संबंधाबाबत जोडप्यावर दबाव कमी राहतो. उदाहरण सांगायचं तर एक जोडपं म्हणून तुम्ही लैंगिक क्रियेतून परमोच्च आनंद मिळण्यावर भर देत असाल. असही होऊ शकतं की, दोघांपैकी एका जोडीदाराला काही लैंगिक समस्याही असेल. अशात परिस्थितीमध्ये तज्ज्ञ नेहमी शारीरिक संबंधातून काही दिवस ब्रेक घेण्याचा सल्ला देतात.
नात्यात पुन्हा नवा उत्साह
तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा शारीरिक संबंधातून ब्रेक घेतला जातो, तेव्हा जोडीदार एकमेकां प्रति आतुर झालेले असतात आणि एकमेकांची वाट पाहत असतात. त्यामुळे त्यांच्यातील हरवलेलं प्रेम, हरवलेला उत्साह पुन्हा येतो.
भावनात्मक जवळीकता
शारीरिक संबंधातून काही दिवस ब्रेक घेतल्याने दोघांना वेगळ्याप्रकारे जवळ येण्यासाठी फार वेळ असतो. दोघेही एकमेकांच्या भावनात्मक गरजा समजू शकतात. याचा फायदा नातं आणखी घट्ट होण्यासाठी होतो.