लैंगिक जीवन : तुम्ही डेमिसेक्शुअल तर नाहीत ना? जाणून घ्या याची लक्षणे...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 03:51 PM2019-06-20T15:51:11+5:302019-06-20T15:55:03+5:30
गेल्या काही वर्षांपासून काही लोक सेक्शुअॅलिटीबाबत मोकळेपणाने बोलू लागले आहेत. मोकळ्यापणाने बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी असलं तरी त्यामुळे नव्याने अनेक गोष्टी समोर येत आहेत.
(Image Credit : Medium)
गेल्या काही वर्षांपासून काही लोक सेक्शुअॅलिटीबाबत मोकळेपणाने बोलू लागले आहेत. मोकळ्यापणाने बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी असलं तरी त्यामुळे नव्याने अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता या मुद्यावर अनेकांना बिनधास्तपणे आपलं मत मांडायचं आहे. अलैंगिक(अलैंगिक संबंध वेगळं) एक असा शब्द आहे ज्याबाबत तुम्ही कधी ऐकलं नसेल.
या सेक्शुअॅलिटीमध्ये येणाऱ्या लोकांना शारीरिक संबंधाची इच्छा होत नाही किंवा जे समोरच्या व्यक्तीसोबत कोणतही नातं किंवा भावनिक नातं नसताना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तयार होता. आणि ते लोक जे महिला किंवा पुरूष दोघांसोबतही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी इच्छुक असतात.
(Image Credit : Women's Health)
डेमिसेक्शुअल म्हणजे काय?
जर तुम्ही डेमिसेक्शुअल असाल तर तुम्ही केवळ त्यांच्यासोबतच शारीरिक संबंध ठेवायचं मन करेल ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे किंवा त्या व्यक्तीशी ज्यांच्याशी तुम्ही भावनिकरित्या जुळलेले असता. डेमिसेक्शुअॅलिटीला ग्रे सेक्शुअॅलिटीही म्हटलं जातं. ज्यात शारीरिक संबंधच सगळं काही नसतात.
डेमिसेक्शुअल कसे असतात?
आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी डेमिसेक्शुअल लोकांना एक खोलवर भावनिक जवळीकतेची गरज असते. हे लोक प्रेमशिवाय कुणासोबतही शारिरिक संबंध ठेवत नाहीत. यांच्यासाठी शारीरिक संबंधापेक्षा भावनिक नातं महत्त्वाचं असतं.
डेमिसेक्शुअल आणि अलैंगिकमध्ये काय फरक आहे?
अलैंगिक लोकांना सेक्स करणं अजिबात पसंत नसतं आणि त्यांच्या सेक्सची इच्छाही नसते. तेच दुसरीकडे डेमिसेक्शुअल व्यक्ती हे केवळ ज्यांच्यावर ते प्रेम करतात त्यांच्यासोबतच शारीरिक संबंध ठेवण्यास तयार होतात.
अनेकांना रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत असतं, पण तरी सुद्धा ते एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा ठेवू शकतात. डेमिसेक्शुअल व्यक्ती केवळ ते ज्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जुळलेले असतात त्यांच्याशीच शारीरिक संबंध ठेवतात.
LGBTQ+ मध्ये येतात डेमिसेक्शुअल?
डेमिसेक्शुअल व्यक्ती LGBTQ+ पेक्षा थोडे वेगळे असतात. त्यामुळे त्यांना या श्रेणीमध्ये ठेवता येत नाही.