लैंगिक जीवन : ऐन वेळेला घात होतो का? जाणून घ्या उपाय....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 04:05 PM2019-10-12T16:05:26+5:302019-10-12T16:06:07+5:30
या समस्येमुळे अनेकदा वैवाहिक जीवनात प्रेम कमी होऊ लागतं. कपल्समध्ये भांडणं होतात. अशात योग्य वेळीच यावर उपाय करणं ही समजदारी ठरू शकते.
(Image Credit : psychologytoday.com)
इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणजेच प्रायव्हेट पार्टमध्ये ताठरता ने येणे ही समस्या प्रामुख्याने पुरूषांमध्ये होते. या समस्येमुळे अनेकदा वैवाहिक जीवनात प्रेम कमी होऊ लागतं. कपल्समध्ये भांडणं होतात. अशात योग्य वेळीच यावर उपाय करणं ही समजदारी ठरू शकते.
का होते इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या?
शारीरिक संबंधादरम्यान इरेक्शन(ताठरता) न होणं ही समस्या इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणून ओळखली जाते. या समस्येत प्रायव्हेट पार्टमध्ये ताठरता न येणे किंवा कायम न राहण्याची अडचण येते. शारीरिक संबंधादरम्यान तुम्हाला जेव्हा ही समस्या होत असेल तर लगेच सेक्सॉलॉजीस्टचा सल्ला घ्यावा. जर तुम्हाला थकवा, तणाव किंवा कमजोरीमुळे असं होत असेल तर तुम्ही स्वत: काही सवयी फॉलो करून ही समस्या दूर करू शकता.
मांसपेशी करा मजबूत
यात तुम्हाला सिक्स पॅक करण्यासाठी एक्सरसाइज करायची नाहीये. तुम्हाला कंबर आणि मांड्यांमध्ये मजबूती आणणाऱ्या एक्सरसाइज करायच्या आहेत. जेणेकरून इरेक्शनची समस्या दूर होईल. ब्रिटनमधील एका रिसर्चनुसार, लागोपाठ तीन ते चार महिन्यांपर्यंत कंबर आणि मांड्यांची एक्सरसाइज करावी. स्मोकिंग सोडली, वजन कमी केलं तर सकारात्मक रिझल्ट बघायला मिळू शकतो.
आहारात करा बदल
मॅसाचुसेट्स मेल एजिंग रिसर्चनुसार, फळ, भाज्या, कडधान्य असा पौष्टिक आहाराचा डाएटमध्ये समावेश करावा. यानेही इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर होण्यास मदत होते. प्रयत्न करा की, व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार तुम्ही घ्यावा. या दोन गोष्टींच्या कमतरतेमुळे सुद्धा ही समस्या सुरू होते.
पेल्विक फ्लोर एक्सरसाइज
पेल्विक फ्लोर म्हणजे ओटीपोटाच्या आजूबाजूचा भाग मजबूत होण्यासाठी किंवा या भागातील मांसपेशी मजबूत होण्यासाठी करावी लागणारी एक्सरसाइज. याने तुमची शारीरिक संबंधाची क्षमताही वाढते. यासाठी एक्सपर्टकडून तुम्ही एक्सरसाइज जाणून घेऊ शकता. एका रिसर्चनुसार, पेल्विक एरियातील एक्सरसाइज केल्याने जवळपास ४० टक्के पुरूषांमध्ये इरेक्टाइलची समस्या सामान्य झाली.
रोज पायी चला
हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, फिट राहण्यासाठी रोज ३० मिनिटे चालणे फायदेशीर राहतं. तसेच याने इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या देखील दूर होते. अर्धा तास चालल्याने ४१ टक्क्यांपर्यंत इरेक्टाईल डिस्फंक्शनचा धोका कमी होऊ शकतो.
ब्लड प्रेशर योग्य ठेवा
ब्लड प्रेशर वाढणं किंवा कमी होणं सेक्शुअल हेल्थसाठी चांगलं नाही. हाय आणि लो ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल इत्यादींमुळे हृदयाच्या धमण्यांचं नुकसान होतं. याने हार्ट डिजीज, हार्ट अटॅक यांचाही धोका असतो. या समस्या इरेक्टाइल डिस्फंक्शनचं कारण ठरू शकतात.