लैंगिक जीवन : शारीरिक संबंध न ठेवल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 04:47 PM2021-02-18T16:47:17+5:302021-02-18T16:48:23+5:30
Sexual health Tips: वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच शारीरिक आणि मानसिक रूपाने बदल बघायला मिळतात. चला जाणून घेऊन जे लोक शारीरिक संबंध ठेवत नाहीत त्यांच्यावर काय प्रभाव पडतो.
Sexual health Tips: शारीरिक संबंध ठेवणं ही वैवाहिक जीवनातील महत्वाची आणि सामान्य बाब आहे. पण हा विषय भारतात अजूनही हळू आवाजात आणि चोरून बोलण्याचा विषय आहे. याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज किंवा संभ्रमही आहेत. लोकांना याबाबत बोलायचं नसतं. आपल्या देशात शारीरिक संबंध ठेवणं जमतं पण त्यावर बोलणं जमत नाही. त्यामुळेच अनेकांना लैंगिक जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसे तर वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच शारीरिक आणि मानसिक रूपाने बदल बघायला मिळतात. चला जाणून घेऊन जे लोक शारीरिक संबंध ठेवत नाहीत त्यांच्यावर काय प्रभाव पडतो.
नात्यावर पडतो प्रभाव
वैवाहिक जीवनात कपल्सना आपलं नातं मजबूत करण्यासाठी नियमितपणे शारीरिक संबंध ठेवावा लागतो. दोघांच्याही सहमतीने नियमितपणे शारीरिक संबंध ठेवले तर दोघांची जवळीकता वाढते. नातं मजबूत होतं. भावनात्मकरित्या तुम्ही तुमच्या पार्टनरजवळ अधिक राहता. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं? जाणून घ्या तथ्य....)
जेव्हा तुम्ही अनेक दिवस शारीरिक संबंध ठेवत नाही किंवा ठेवतच नाही तर काय होतं? काही लोकांचे त्यांच्या पार्नरसोबतचे संबंध तणावपूर्ण होतात. ते एकमेकांशी जुळलेले आहेत असा विचार करणं बंद करतात. हे सगळ्यांसोबत होतं असं नाही. कारण काही लोकांना हे मान्य नसतं की, केवळ शारीरिक संबंध ठेवल्यानेच रिलेशनशिप चांगलं होतं.
तणाव वाढतो
शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होतात. हे न्यूरोकेमिकल्स चिंता किंवा तणावाची स्थिती निर्माण होण्यास रोखतात. तेच ऑक्सीटोसिनमुळे तुम्हाला चांगली झोप येते. जर तुम्ही नियमितपणे शारीरिक संबंध ठेवत नसाल तर तुमचं शरीर हे महत्वाचे हार्मोन कमी वेळा रिलीज करतील. ज्यामुळे तणावाचा सामना करावा लागू शकतो. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!)
इम्यूनिटीवरही पडतो प्रभाव
जर तुमचं लग्न झालं आहे आणि तुम्ही शारीरिक संबंध ठेवत नसाल तर याा तुमच्या इम्यूनिटी सिस्टीमवर प्रभाव पडत. जर तुमची इम्यूनिटी मजबूत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून बचाव करू शकता. पण तुम्ही काही कारण नसताना शारीरिक संबंध ठेवत नसाल तर तुमची इम्यूनिटी कमजोर होऊ शकते. काही रिसर्चमधून समोर आले आहे की, जेव्हा लोक शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा शरीरात इम्यूनोग्लोबिन केमिकल वाढतं. याने आपलं शरीर अनेक रोगांसोबत लढू शकतं.
त्वचेवरही पडतो प्रभाव
जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवत नसाल तर याचा फरक तुमच्या त्वचेवरही दिसतो. तुम्ही ऐकलं असेल की, शारीरिक संबंध ठेवल्याने त्वचा तजेलदार दिसते. शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात डोपामाइन हार्मोन रिलीज होतात. आणि यानेच आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.