लैंगिक जीवन : नव्या उत्साहासाठी 'ही' पद्धत ठरेल सर्वात खास...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 04:40 PM2021-02-05T16:40:16+5:302021-02-05T16:43:45+5:30
शेड्यूल सेक्समुळे बिझी लाइफस्टाईलमध्येही एक नवा तडका मिळतो. चला जाणून घेऊ कशाप्रकार शेड्यूल सेक्समुळे तुमच्या लैंगिक जीवनात तुम्ही नवा जोश आणू शकता.
(Image Credit : familyeducation.com)
शारीरिक संबंधामुळे कपल केवळ भावनिकदृष्टीनेच जवळ येतात असं नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. असं असलं तरी अनेकदा बिझी शेड्यूलमुळे लोक शारीरिक संबंध टाळतात किंवा त्यांना शक्य होत नाही. याचा प्रभाव त्यांच्या नात्यावरही पडतो. तुमच्यासोबतही असं होत असेल तर 'शेड्यूल सेक्स' तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शेड्यूल सेक्स ऐकायला जरा विचित्र वाटतं, पण याचे फायदेही अनेक आहेत. शेड्यूल सेक्समुळे बिझी लाइफस्टाईलमध्येही एक नवा तडका मिळतो. चला जाणून घेऊ कशाप्रकार शेड्यूल सेक्समुळे तुमच्या लैंगिक जीवनात तुम्ही नवा जोश आणू शकता.
शेड्यूल करा तयार
जर तुम्ही लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात तर तुम्हाला शेड्यूल सेक्सची टर्म नक्कीच माहीत असायला हवी. यात दोघांनी मिळून शारीरिक संबंधासाठी एक अशी वेळ ठरवावी लागते जेव्हा दोघेही पूर्णपणे मोकळे असाल. म्हणजे काय तर सगळंकाही ठरवून केलं जातं. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे अनेक महिला परमोच्च सुखापासून राहतात वंचित!)
कॅलेंडरवर मार्क करा
जर तुम्ही दोघेही शारीरिक संबंधासाठी दिवस आणि वेळ ठरवत असाल तर ती लेखी ठेवा. हवं तर दिवस आणि वेळ कॅलेंडरवर लिहून ठेवा म्हणजे लक्षात राहील. इतकंच काय तर मोबाइलमध्ये अलार्मही लावू शकता.
सोबत घालवा चांगला वेळ
टेक्नॉलॉजीच्या या जगात सगळंच व्हर्चुअल झालं आहे. प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठीही लोकांकडे वेळ नाही. अशात जर तुम्ही आधीच शारीरिक संबंधाचं प्लॅनिंग कराल तर दिवसातला एक ठराविक वेळ तुम्ही सोबत असाल. बिझी लाइफमधून सोबत घालवलेला हा वेळ तुमचं नातं अधिक मजबूत करेल. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : ४८ तासांपर्यंत तुमच्यासोबत राहतो शरीरसंबंधानंतरचा हा फायदा....)
फिक्स राहतो वेळ
शेड्यूल सेक्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही हे अव्हॉइड करू शकणार नाहीत. नाही तर या व्यस्त जीवनशैलीत आणि तणावाच्या वातावरणात तुमच्या डोक्यात शारीरिक संबंधाचा विचारही येणार नाही. शारीरिक संबंधाची वेळ फिक्स असेल तर तुम्ही त्यानुसार तुमची इतर कामे प्लॅन कराल.
तयारीसाठी मिळतो वेळ
जेव्हा तुम्ही शारीरिक संबंधाचं प्लॅनिंग करता तेव्हा त्या क्षणांसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतो. तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनात नवा रोमांच हवा असेल तर शेड्यूल सेक्स चांगला पर्याय ठरू शकतो. याने शारीरिक संबंधाची उत्सुकताही कायम राहील.