लैंगिक जीवन : अधिक आनंदासाठी कोणती वेळ योग्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 03:49 PM2019-01-15T15:49:19+5:302019-01-15T15:50:05+5:30
आजच्या धावपळीच्या लाइफस्टाइलममध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
आजच्या धावपळीच्या लाइफस्टाइलममध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जास्तीत जास्त लोक हे वेगवेगळ्या कारणांनी तणावात राहत असल्याने त्यांचं लैंगिक जीवन प्रभावित होत आहे. त्यासोबतच काही लोकांच्या शरीरात हार्मोन्सचं संतुलन बिघडल्याने त्यांचा शारीरिक संबंधातील रस कमी होताना दिसतो आहे. तुम्ही जर तुमच्यानुसार, शारीरिक संबंधासाठी योग्य वेळ जाणून घ्याल तर तुमचंही लैंगिक जीवन हेल्दी होऊ शकतं.
तज्ज्ञांनुसार, लैंगिक जीवन चांगलं ठेवण्यासाठी सकाळच्या वेळी शारीरिक संबंध ठेवणे अधिक फायदेशीर ठरतं असं अनेक शोधातून समोर आलं आहे. याचं शारीरिक आणि मानसिक कारण आहे. विज्ञानाचं असं म्हणणं आहे की, आपल्या शरीरात कार्टिसोलचा स्तर सकाळी वाढणे सुरु होतो आणि दिवसाच्या दरम्यान हळूहळू एड्रिनल ग्रंथीमध्ये तणाव निर्माण करतं. सकाळी उठल्यानंतर व्यक्ती आपल्या नियमीत कामांना म्हणजे नाश्ता तयार करणे, मुलांना शाळेसाठी तयार करणे, त्यांना शाळेत सोडणे आणि आपली तयारी करणे यात व्यस्त होतात. या सर्व कामांमुळे तणावा वाढतो.
त्यामुळे वेगवेगळ्या रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की, पहाटे चार ते सहा ही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सर्वात उत्तम वेळ आहे. इतर वेळेपेक्षा यावेळी कपल्स अधिक आनंद मिळवू शकतात. या वेळेत चांगले शारीरिक संबंध होणे याचं एक कारण म्हणजे रात्री चांगली झोप होऊन व्यक्तीचा संपूर्ण तणाव दूर होतो आणि सकाळी शारीरिक संबंध ठेवल्यावर अधिक सूख मिळतं. अनेकजण सकाळी शारीरिक संबंध ठेवताना ऑर्गॅज्मचाही आनंद घेऊ शकतात.
असं का?
ज्याप्रकारे दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी एका हेल्दी ब्रेकफास्टची गरज असते, त्याचप्रमाणे सकाळी शारीरिक संबंध ठेवल्यावर व्यक्ती संपूर्ण दिवस अधिक सक्रिय, अधिक एकाग्र आणि तणावमुक्त राहतो. पण त्यासोबतच आणखीही काही अशी कारणे आहेत ज्यामुळे पहाटे पहाटे शारीरिक संबंध ठेवणे चांगलं मानलं जातं.