लैंगिक जीवन : का असतो महिला आणि पुरुषांचा वेगळा दृष्टीकोन?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 03:44 PM2018-12-26T15:44:55+5:302018-12-26T15:47:04+5:30
जर तुम्ही एखाद्या पुरुषाला विचाराल की, तू तुझ्या लैंगिक जीवनाचं मुल्यांकन कसं करतो? तर तो पूर्ण विश्वासाने सांगेल की, सगळं खास आहे.
जर तुम्ही एखाद्या पुरुषाला विचाराल की, तू तुझ्या लैंगिक जीवनाचं मुल्यांकन कसं करतो? तर तो पूर्ण विश्वासाने सांगेल की, सगळं खास आहे. तेच जर त्यांच्या पत्नीला हाच प्रश्न विचारला गेला तर त्या यावर ५/१० रेटींग देतील. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, ५५ टक्के महिलांना याबाबत खात्री होती की, त्यांचे पती लैगिक जीवनाबाबत संतुष्ट आहेत. तेच ७९ टक्के पुरुषांचं असं मत आहे की, ते यापेक्षा जास्त संतुष्ट होऊ शकत नाहीत.
अंतर समजून घ्या
हे अंतर सांगतं की, महिला आपल्या पार्टनरच्या लैंगिक प्रतिक्रिया बघण्यात, समजून घेण्यात आणि त्यांच्या संतुष्टीचा स्तर जाणून घेण्यास चुकतात. यातून त्यांच्यात आपल्या जोडीदाराला संतुष्ट करण्याचा आत्मविश्वास कमी असल्याचं जाहीर होतं.
फार जास्त आहे फरक
महिला आणि पुरुषांच्या लैंगिक प्रतिक्रियांमध्ये जमीन-आसमानचा फरक असतो. असं होऊ शकतं की, पुरुषांना शारीरिक संबंधातून फार संतुष्टी मिळाल्यावर ते शांत होत असतील. त्यामुळे त्यांच्या पत्नीचं संभ्रमात पडणं किंवा त्यांना याबाबत संशय असणं स्वाभाविक आहे. पण या गोष्टींचा त्यांच्या लैंगिक क्रियांशी काहीही देणंघेणं नाहीये.
स्वत:ला द्या प्राथमिकता
तज्ज्ञांनुसार, पुरुष आणि खासकरुन भारतातील पुरुषांना हे कळत नाही की, शारीरिक संबंधानंतर जोडीदारासोबत घालवलेले काही खास क्षण त्यांना याची जाणिव करुन देतात की, आताच झालेल्या शारीरिक संबंधातून ते संतुष्ट झाले. पुरुष शारीरिक संबंधाप्रति फार भावनात्मक असतात. त्यामुळे त्यांना हे काहीच ठावूक नसतं की, त्यांच्या व्यवहारातून तुम्ही असंतुष्ट असल्याची लक्षणे शोधत आहात.
शारीरिक संबंध दोघांच्याही गरजा भागवण्याचं साधन आहे. त्यामुळे यातून केवळ एकालाच खूश करायचं असतं ही भावना मनातून दूर करा. तज्ज्ञ सांगतात की, अनेकदा महिलांचं लक्ष हे त्यांच्या जोडीदाराला खूश करण्यावर लागलेलं असतं. असं न करता स्वाभाविक रुपाने त्यांनी आपल्या संतुष्टीवर आणि आनंदावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. आपल्या जोडीदार पुरुषाला खूश करण्याचा नाद सोडून स्वत:च्या आनंदाचा विचार करावा. याने दोघांनाही आनंद मिळेल.