लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूष लगेच का झोपतात? वाचा खरं कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 04:13 PM2021-02-06T16:13:14+5:302021-02-06T16:23:05+5:30
शारीरिक संबंधानंतर अनेक पुरूष लगेच झोपतात. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना वाटतं की, पुरूष रिलेशनशिपमध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाहीत. पण यामागे बायोलॉजिकल कारण आहे.
सामान्यपणे शारीरिक संबंधानंतर एकीकडे महिला आफ्टरप्ले करण्याच्या मूडमध्ये असतात म्हणजे त्यांची पुरूष जोडीदाराला जवळ घेण्याची किंवा मिठी मारण्याची इच्छा असते. तर दुसरीकडे पुरूष हे केवळ लगेच झोपण्याच्या मूडमध्ये असतात. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना वाटतं की, पुरूष रिलेशनशिपमध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाहीत. पण यामागे इंटरेस्ट घेणं न घेण्याचं कारण नाही. यामागे बायोलॉजिकल कारण आहे. चला जाणून घेऊ शारीरिक संबंधानंतर लगेच का झोपतात?
इजॅक्युलेशनमुळे जाणवतो थकवा
Post-coitus sleep म्हणजे शारीरिक संबंधानंतर झोपणं हे काही गैर नाही किंवा ही कोणती समस्याही नाही. अनेक रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, सेक्शुअल इंटरकोर्सनंतर पुरूषांना जास्त थकवा जाणवतो त्यामुळे त्यांना लगेच झोप येऊ लागते. इजॅक्युलेशन दरम्यान पुरूषांच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स आणि केमिकल्स रिलीज होतात. ज्यामुळे झोप येते आणि पुरूष झोपतात. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : नव्या उत्साहासाठी 'ही' पद्धत ठरेल सर्वात खास...)
प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे लागते डुलकी
इंटरकोर्स दरम्यान जसेही पुरूष क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतात आणि त्यांना संतुष्टीचा अनुभव मिळतो, तसे त्यांच्या शरीरात हार्मोन्स रिलीज होता. याला प्रोलॅक्टिन म्हणतात. ज्यामुळे पुरूषांना झोप येऊ लागते.
एनर्जी कायम ठेवणाऱ्या हार्मोनची कमतरता
शारीरिक संबंध आणि क्लायमॅक्स दरम्यान होणाऱ्या तणावामुळे आणि मेहनतीमुळे एनर्जी निर्माण करणाऱ्या ग्लायकोजन हार्मोन्सची शरीरात कमतरता होते. यामुळे पुरूषांना झोप येऊ लागते. पुरूषांच्या शरीराचं मसल मास, महिलांपेक्षा अधिक असतं. त्यामुळे पुरूषांना महिलांच्या तुलनेत अधिक थकवा जाणवतो. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे अनेक महिला परमोच्च सुखापासून राहतात वंचित!)
लव्ह हार्मोन ऑक्सिटोसिन
शारीरिक संबंधादरम्यान रिलीज होणारे लव्ह हार्मोन ऑक्सिटोसिन सुद्धा शरीराला आराम देण्यास मदत करतात. त्यामुळे शारीरिक संबंधानंतर पुरूषांना जी संतुष्टी मिळते, त्याकारणाने पुरूषांना झोप येऊ लागते.
जास्त शारीरिक श्रम
महिलांच्या तुलनेत पुरूषांना शारीरिक संबंधावेळी अधिक श्रम करावे लागतात आणि त्यामुळे त्यांना अधिक थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांना झोप येऊ लागते. याच कारणांमुळे पुरूष आफ्टरप्लेमध्ये जास्त सहभागी नसतात.