लैंगिक जीवन : पुरूषांची उत्तेजना वाढवणारं वेगळंच 'रसायन'....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 03:56 PM2019-10-17T15:56:43+5:302019-10-17T15:56:54+5:30

गेल्या दशकांमध्ये याची फार वाढ झाली आहे. पण हे इरॉटिक लॅक्टेशन काय असतं आणि काही पुरूषांमध्ये पार्टनरच्या ब्रेस्ट मिल्कबाबत इतकी क्रेज का असते हे जाणून घेऊ...

Why do men some men have breast milk fetish | लैंगिक जीवन : पुरूषांची उत्तेजना वाढवणारं वेगळंच 'रसायन'....

लैंगिक जीवन : पुरूषांची उत्तेजना वाढवणारं वेगळंच 'रसायन'....

googlenewsNext

इरॉटिक लॅक्टेशन म्हणजे शारीरिक संबंधादरम्यान पुरूषांनी पार्टनरच्या ब्रेस्ट मिल्कचं सेवन करणं. ही एक अशी स्थिती आहे ज्याबाबत फारच कमी बोललं जातं. कारण ही काही असामान्य बाब नाही. गेल्या दशकांमध्ये याची फार वाढ झाली आहे. पण हे इरॉटिक लॅक्टेशन काय असतं आणि काही पुरूषांमध्ये पार्टनरच्या ब्रेस्ट मिल्कबाबत इतकी क्रेझ का असते हे जाणून घेऊ...

सर्व्हेतून आश्चर्यजनक खुलासा

लंडनच्या एका साप्ताहिकाकडून २००५ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेमधून खुलासा करण्यात आला होता की, साधारण ३३ टक्के पुरूषांनी त्यांच्या पार्टनरचं ब्रेस्ट मिल्कचं सेवन केलं होतं. ब्रेस्ट म्हणजेच स्तनांना सर्वात मुख्य सेक्शुअल ऑर्गन म्हणून पाहिलं जातं. अशात वयस्क स्तनपान ही फार हैराण करणारी बाब नाहीय. आणि कदाचित हेच कारण असेल की, एक्सपर्ट्सनी याला एक रिलेशनशिपची कॅटेगरीच केलं आहे. याला अ‍ॅडल्ट नर्सिंग रिलेशनशिप असं म्हणतात. 

काय आहे लॅक्टोफीलिया?

ज्या पुरूषांमध्ये ब्रेस्ट मिल्कबाबत क्रेझ किंवा कामोत्तेजना होते, त्याला लॅक्टोफीलिया किंवा मिल्क फेटेशिज्म असं म्हटलं जातं. या दोन्ही मेडिकल टर्म आहेत आणि पॅराफीलिया हा एक प्रकार आहे. शारीरिक संबंधाशी संबंधित असामान्य किंवा एक्सट्रीम इच्छांशी निगडीत समस्यांना पॅराफीलिया असं म्हटलं जातं. महिला आणि पुरूष दोघांसाठीही ब्रेस्ट किंवा स्तन हे एक सर्वाधिक कामोत्तेजक अवयव आहेत.

मिल्क फ्लोसाठी प्रेग्नन्सी गरजेची नाही

एकदा जर निप्पल्स उत्तेजित झाले तर unintended मिल्क फ्लो सुरू होतो. तुम्हाला हे माहीत असावं की, ब्रेस्ट मिल्कच्या उत्पादनासाठी प्रेग्नन्सी गरजेची नाही. जर ब्रेस्ट आणि निप्पल्स खासप्रकारे स्टीम्युलेट केलं गेलं तर ब्रेस्ट मिल्क निघू शकतं.

लॅक्टोफीलियावर रिसर्च

जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनचे डॉक्टर मॅगनस इन्क्विस्ट यांनी एक रिसर्च केला. ज्यात ब्रेस्टबाबत क्रेझ असलेल्या लोकांच्या व्यवहाराची आणि आवडी-निवडीची माहिती एकत्र केली गेली. रिसर्चमध्ये सहभागी लोकांपैकी ७१ टक्के लोक म्हणाले की, त्यांना लॅक्टेशन म्हणजे ब्रेस्ट मिल्क आणि प्रेग्नन्सी या दोन्हींबाबत कामोत्तेजना जाणवते. तेच साधारण ११ टक्के लोक म्हणाले की, त्यांना केवळ स्तनपानामुळे कामोत्तेजना जाणवते.


Web Title: Why do men some men have breast milk fetish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.