लैंगिक जीवन : ...म्हणून सिनेमा आणि रिअल लाइफमधील 'कार्यक्रमात' असतो फरक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 03:53 PM2019-10-19T15:53:58+5:302019-10-19T15:55:05+5:30
रोमॅंटिक सिनेमे पाहताना जेव्हा स्क्रीनवर हॉट आणि सेक्सी सीन येतो तेव्हा तुमच्या अंगावर शहारे येतात का? सिनेमे किंवा पॉर्न बघताना जर तुम्हाला काहीतरी होत असेल तर याची दोन कारणे आहेत.
(Image Credit : Navbharat Times)
रोमॅंटिक सिनेमे पाहताना जेव्हा स्क्रीनवर हॉट आणि सेक्सी सीन येतो तेव्हा तुमच्या अंगावर शहारे येतात का? सिनेमे किंवा पॉर्न बघताना जर तुम्हाला काहीतरी होत असेल तर याची दोन कारणे आहेत. पहिलं हे की, असे सीन्स फार पॅशनेट असतात आणि दुसरं हे की, हे खरे नसतात. हेच कारण आहे की, तुम्ही कितीही प्रयत्न करून इरॉटिक सेक्शुअल सीन्स रिअल लाइफमध्ये कॉपी करू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशी पाच कारणे सांगत आहोत, ज्याव्दारे हे कळून येतं की, रिअल लाइफ सेक्स, सिनेमातल्या सेक्शुअल सीन्सपेक्षा वेगळे असतात.
आपलं शरीर कलाकारांसारखं परफेक्ट नसतं
सिनेमातील अभिनेत्याला सिक्स पॅक अॅब्स असतात आणि अभिनेत्रीला परफेक्ट कर्व्स असलेली बॉडी असते. स्क्रीनवर दिसणारे हे सीन्स चांगले दिसावे म्हणून वेगवेगळ्या अॅंगलने शूट केले जातात आणि त्यामुळेच ते परफेक्ट दिसतात. रिअल लाइफमध्ये असं होत नसतं. आपल्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स असतात, लठ्ठपणा असतो, शरीरावर केस दिसतात, ब्रेस्टचा शेप परफेक्ट नसतो. परफेक्ट बॉडी नसण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांसोबत होते. त्यामुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या सेक्स सीन्ससोबत तुमची तुलना कराल तर तुम्हाला न्यूनगंड येऊ शकतो.
श्वासांची दुर्गंधी
सिनेमात तुम्ही अनेकदा कपल्सना सकाळी झोपेतून उठत नाही तर लव्हमेकिंग करताना पाहिलं असेल. हे पाहून तुम्हीही कधीना कधी हा विचार केला असेल की, त्यांना तोंडाची दुर्गंधी येत नसेल का? या कलाकारांना तुम्ही ब्रश करताना किंवा माउथवॉश वापरताना बघत नाहीत. पण प्रत्यक्षात असं काही करणं शक्य होत नाही. असं काही करायला जाल तर पश्चातापाशिवाय काही मिळणार नाही.
रिअल लाइफ संबंध कार्यक्रम सोपा नसतो
सिनेमात शारीरिक संबंधाचे सीन्स जेवढे सरळ आणि सहज दाखवले जातात, रिअल लाइफमध्ये हे तेवढं सोपं नसतं. तुमचे कपडे सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे सहज आणि पटकन निघत नाहीत. ब्रा ची हूक असो वा जीन्सची बटन रिअल लाइफमध्ये शारीरिक संबंधापूर्वी कपडे काढणं तेवढं भारी नसतं, जेवढं स्क्रीनवर दाखवलं जातं.
प्रोटेक्शन वापरताना दिसत नाहीत
तुम्ही सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या इंटीमेट सीनदरम्यान क्वचितच अभिनेत्याला मधेच थांबून कंडोमचं पॅकेट उघडून त्याचा वापर करताना पाहिलं असेल. सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या लव्हमेकिंग सीनदरम्यान कोणत्याही प्रकारचा ब्रेक नसतो. पण रिअल लाइफमध्ये नको असलेली गर्भधारणा आणि कोणत्याही प्रकारची सेक्शुअल समस्या रोखण्यासाठी कंडोमचा वापर आवर्जून करावा लागतो.