लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिला काढत असलेल्या आवाजाचं रहस्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 04:42 PM2020-02-03T16:42:13+5:302020-02-03T16:42:22+5:30

‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, ‘मर्डर’, ‘डेली बेली’ सारख्या सिनेमात असो वा ‘लस्ट स्टोरीज’, ‘मेड इन हेवन’ सारख्या वेबसीरीजमध्ये असो यातील बोल्ड सीन्समध्ये अभिनेत्री इंटरकोर्सवेळी वेगवेगळी आवाजे काढताना ऐकायला मिळते.

Why women make so much noise during sex? | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिला काढत असलेल्या आवाजाचं रहस्य काय?

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिला काढत असलेल्या आवाजाचं रहस्य काय?

googlenewsNext

‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, ‘मर्डर’, ‘डेली बेली’ सारख्या सिनेमात असो वा ‘लस्ट स्टोरीज’, ‘मेड इन हेवन’ सारख्या वेबसीरीजमध्ये असो यातील बोल्ड सीन्समध्ये अभिनेत्री इंटरकोर्सवेळी वेगवेगळी आवाजे काढताना ऐकायला मिळते. या सिनेमातच नाही तर रिअल लाइफमध्येही महिला शारीरिक संबंधावेळी अशाच आवाज काढतात. हे तर सर्वांनाच मान्य असेल की, अशाप्रकारचा आवाज पुरूषांना वेगळाच आनंद देतात. पण अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल की, महिला असा आवाज का काढतात? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत.

काय आहे कारण?

शारीरिक संबंधावेळी आवाज करण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे महिला जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्सचा आनंद घेत असतात तेव्हा असा आवाज काढून त्या प्लेजरला रिस्पॉन्स करत असतात. संबंधातून मिळणारा आनंद त्या या आवाजातून व्यक्त करत असतात. शारीरिक संबंधावेळी साधारणे महिला वेगवेगळे आवाज काढतात. याने पुरूष पार्टनरची उत्तेजनाही वाढते.

पार्टनरला चांगलं वाटावं म्हणून....

शारीरिक संबंधावेळी पार्टनरला चांगलं वाटावं म्हणूनही महिला आवाज करतात. याने पार्टनरला आनंद आणि संतुष्टीची जणीव होते. शारीरिक संबंध ठेवताना स्क्रीम म्हणजे आवाज काढणं एक महत्वाचं आहे. कारण अशात तुमच्या पार्टनरचा लक्ष पूर्णपणे तुमच्यावर केंद्रीत राहतं. 

वेदनाही असू शकतं कारण

Sex Life: What is reason of urination in urine after masturbation | लैंगिक जीवन : हस्तमैथुन केल्यावर लघवी करताना वेदना किंवा त्रास का होतो?

शारीरिक संबंधावेळी पुरूष पार्टनर जर कठोरपणे वागत असेल किंवा पेनिस्ट्रेशनदरम्यान एखाद्या अशी जागी हिट करत असेल जिथे असहजता वाटते, अशात महिला वेदना होत असल्यानेही आवाज काढत असतात.

कामेच्छा वाढवण्यासाठी

आजकालचं जीवन हे स्ट्रेसने भरलेलं आहे. याचा प्रभाव लैंगिक जीवनावरही पडतो. इतकेच काय तर शारीरिक संबंधावेळी तुमच्या डोक्यात कितीतरी दुसरे विचार सुरू असतात. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे शारीरिक संबंधाचा आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या स्थितीत तुमचं मन भरकटू नये म्हणूनही महिला आवाज काढतात.

पुरूषांची सेक्शुअल टोन बदलण्यासाठी

ज्याप्रमाणे शारीरिक संबंधावेळी काहीही न बोलता आवाजाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतात. त्याचप्रमाणे पुरूष त्यांचा आवाज ऐकून आपली सेक्शुअल रिदम बदलतात. जसजसा महिलांचा आवाज बदलतो पुरूष त्यांचा रिदमही बदलतात. असेही म्हटले जाते की, महिला 'मोन'(विव्हळणे)च्या माध्यमातून आपल्या पार्टनरला गाइड करत असतात.

उत्साह वाढवण्यासाठी

शारीरिक संबंध एक अशी प्रक्रिया आहे जी तुम्ही तुमच्यानुसार एन्जॉय करता. अनेक कपल्स शारीरिक संबंधावेळी बेडवर वाइल्ड होता तर काही सेक्शुअल इंटरकोर्स सॉफ्ट पद्धतीने पसंत करतात. अशात मोअनिंगच्या माध्यमातून तुम्ही सेक्शुअल सेशन आणखी हॉट करू शकता.

सायलेन्स मूड किलर असतो

महिला शारीरिक संबंधावेळी आवाज करतात कारण त्यांना शारीरिक संबंध ठेवताना सायलेन्स मूड किलर वाटतो. सोबत याने ते क्षण फारच बोरिंग होतात. त्यामुळे दोघेही पूर्णपणे एन्जॉय करू शकत नाहीत. त्यामुळे गप्प बसून न राहता आवाजातून आपला आनंद व्यक्त करतात.

रिसर्च काय सांगतो?

University of Lancashire आणि  University of Leeds मध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, फोरप्ले आणि इतर सेक्शुअल अ‍ॅक्टिविटीजच्या माध्यमातून महिला ऑर्गॅज्म अचीव्ह करतात, नंतर आपल्या पार्टनरला क्लायमॅक्सपर्यंत पोहचवण्यासाठी महिला आवाज काढायला सुरूवात करतात. 

त्यासोबतच रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, महिला विव्हळत असतील तर इजॅक्यूलेशन लवकर होतं. सोबतच काही महिलांचं असं मत आहे की, स्क्रीम केल्याने पार्टनरचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक चांगलं परफॉर्म करतात.


Web Title: Why women make so much noise during sex?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.