लैंगिक जीवन : 'त्यात' घाबरण्यासारखं काही नाहीच; उलट फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 04:58 PM2018-10-30T16:58:46+5:302018-10-30T17:09:12+5:30

जेव्हाही फॅमिली प्लॅनिंचा विषय येतो तेव्हा याची जबाबदारी मुख्यत्वे महिलांवर सोपवली जाते.

Will male vasectomy affect sex life | लैंगिक जीवन : 'त्यात' घाबरण्यासारखं काही नाहीच; उलट फायदा!

लैंगिक जीवन : 'त्यात' घाबरण्यासारखं काही नाहीच; उलट फायदा!

Next

(Image Credit : Healthline)

जेव्हाही फॅमिली प्लॅनिंचा विषय येतो तेव्हा याची जबाबदारी मुख्यत्वे महिलांवर सोपवली जाते. गर्भनिरोधक गोळ्या घेणे असो वा नसबंदी करायची असो या कामांसाठी महिलांना पुढे केलं जातं. भारतात हे नेहमीच पाहिलं जातं की, पुरुष हे नसबंदी करण्याऐवजी कंडोमचा वापर करतात आणि नसबंदीपासून पळतात. 

त्यामुळेच भारतात नसबंदी करणाऱ्या पुरुषांचं प्रमाण फार कमी बघायला मिळतं. नसबंदी करण्याबाबत पुरुषांमध्ये अनेक शंका-कुशंका असतात. सर्वात मोठी भीती म्हणजे अनेक पुरुषांना असं वाटतं की, नसबंदी केल्याने त्यांच्या शारीरिक संबंध ठेवण्याच्या क्षमतेत कमतरता येते किंवा त्यांचा त्यातील रस कमी होतो. तसेच नसबंदी केल्याने खूप वेदना होतात, असाही समज असतो. पण हे सत्य नाही. नसबंदी केल्याने पुरुषांना अजिबात वेदना होत नाहीत. अॅनेस्थेशिया देतेवेळी इंजेक्शनचा जो त्रास होतो तितकाच याचा त्रास होतो. 

नसबंदी केली तरी शुक्राणू तयार होतातच

नसबंदीमध्ये शुक्राणू वाहिनी नलिका बांधली जाते. ज्यामुळे शुक्राणू बाहेर न येतात शरीरातच राहतात. अमेरिकेतील संशोधकांचं म्हणनं आहे की, नसबंदी केलेल्या व्यक्तींचं आरोग्य हे नसबंदी न केलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक चांगलं राहतं. 

लैंगिक क्षमता कायम राहते

अनेकांना वाटणारी ही सर्वात मोठी भीती आहे. पण नसबंदी केल्यानंतर शारीरिक संबंधातील रस कमी होणे, लगेच स्खलन होणे अशा समस्य होत नाही. या भावना आहे तशाच राहतात. फक्त नसबंदी केल्यावर काही दिवसच प्रायव्हेट पार्टमध्ये हलकी वेदना होते. 
तज्ज्ञांनुसार, नसबंदी केल्यावर कोणत्याही प्रकारची नपुसंकता येत नाही, उलट याने शीघ्रपतनाची समस्या दूर होते. तसेच नको असलेल्या गर्भाची चिंता दूर होते आणि यामुळे शारीरिक संबंधाचा आधीपेक्षा अधिक आनंद मिळवता येऊ शकतो.

गर्भप्रतिबंधक शस्त्रक्रियेमुळे सेक्सवर परिणाम होतो का?

गर्भप्रतिबंधक शस्त्रक्रियेमुळे गर्भधारणा होण्याचे थांबते. कारण शुक्राणूंचा अंडाशयापर्यंत जाण्याचा मार्ग बंद झालेला असतो. लैंगिक क्रियेवर याचा काहीही परिणाम होत नाही. ती पूर्वीइतकीच कार्यक्षम असते. कामवासनेचा उगम मेंदूच्या तळाशी असलेल्या कामप्रेरक केंद्रातून होतो. स्पर्श, दृश्य, सुगंध आणि कामुक विचार यामुळे हे केंद्र प्रेरित होत. आणि यापैकी कोणत्याही गोष्टीला शस्त्रक्रियेमुळे धक्का पोहोचत नाही. त्याचबरोबर शरीरातील ज्या हामोर्न्समुळे कामेच्छा नियंत्रित केली जाते, त्या त्या हामोर्न्सवरही शस्त्रक्रियेचा काही परिणाम होत नाही.
 

Web Title: Will male vasectomy affect sex life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.