शारीरिक संबंधासाठी महिला 'ही' ट्रिक वापरुन पुरुषांना करतात आकर्षित!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 04:31 PM2019-04-09T16:31:24+5:302019-04-09T16:41:17+5:30
लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आणि समोरच्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तसे तर महिला आणि पुरुष दोघेही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतात.
(Image Credit : The Modern Man)
लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आणि समोरच्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तसे तर महिला आणि पुरुष दोघेही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. हा सर्व्हे २० ते ४० वयोगटातील लोकांवर करण्यात आला होता. यात समोर आलं की, आवाजाची जी ट्रिक पुरुष वापरतात तिच महिला सुद्धा फॉलो करतात.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, महिला किंवा पुरुष यांना एखाद्या अपोझिट सेक्सच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर ते त्यांना आकर्षित करण्यासाठी काय करतात, हे जाणून घेणे या सर्व्हेचा मुख्य उद्देश होता. महिला आणि पुरुष दोघांनाही सर्वातआधी आकर्षित करतो तो आवाज. याआधी अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, महिलांना इम्प्रेस करण्यासाठी पुरुष त्यांचा डीप व्हॉइसचा वापर करतात. तर या सर्व्हेतून असं समोर आलं आहे की, महिला सुद्धा असंच करतात.
ज्या व्यक्तीसोबत महिलांना लैंगिक संबंध ठेवायचे असतात त्यांना आपल्या कामुक अदा दाखवण्यासोबतच महिला आवाजाच्या लकबीतही बदल करतात. महिला त्यांच्या जास्त हस्की(घोगरा) किंवा मोहक आवाजाचा वापर करतात. किंवा त्या समोरच्याला आकर्षण वाटेल असा डीप व्हॉइसचा, हस्की आवाजाचा(घोगरा) वापर करतात.
सर्व्हेतून समोर आले आहे की, पुरूष सुद्धा त्या महिलांकडे अधिक आकर्षित होतात ज्यांचा आवाज जास्त बारीक नसतो. पहिल्यांदा भेटल्यावर महिलांचा घोगरा आवाज पुरूषांवर अधिक प्रभाव करतो. इतकेच नाही तर महिला आवाज कॉम्पिटिशनसाठीही बदलतात. म्हणजे जर त्यांना एखाद्याशी संबंध ठेवायचे असतील आणि एखादी दुसरीच महिला त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिली महिला दुसऱ्या महिलेचा आवाज निट ऐकून तिच्यापेक्षाही अधिक हस्की आवाजात पुरुषाशी बोलते.
सर्व्हेतून हे समोर आलं आहे की, लैंगिक संबंधादरम्यान महिलांचा आवार पुरुषांना फार प्रभावित करतो. याने पुरुष अधिक उत्तेजित होतात.