'ही' सोपी आसनं नियमित करा अन् लैंगिक जीवनात नवा जोश नवा उत्साह भरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 04:26 PM2019-06-21T16:26:03+5:302019-06-21T16:27:00+5:30

आपणा सर्वांना हे माहीत आहे की, योगाभ्यासामुळे आपलं शरीर कसं फिट आणि योग्य शेपमध्ये ठेवता येतं. पण तुम्हाला माहीत आहे का की, सेक्स लाईफमध्ये अधिक चांगला आनंद मिळवण्यासाठी सुद्धा काही आसनं मदत करतात.

Yoga try these 5 aasan to improve your sex life | 'ही' सोपी आसनं नियमित करा अन् लैंगिक जीवनात नवा जोश नवा उत्साह भरा!

'ही' सोपी आसनं नियमित करा अन् लैंगिक जीवनात नवा जोश नवा उत्साह भरा!

Next

(Image Credit : listingmaniac.com)

आपणा सर्वांना हे माहीत आहे की, योगाभ्यासामुळे आपलं शरीर कसं फिट आणि योग्य शेपमध्ये ठेवता येतं. पण तुम्हाला माहीत आहे का की, सेक्स लाईफमध्ये अधिक चांगला आनंद मिळवण्यासाठी सुद्धा काही आसनं मदत करतात. ही आसनं करून तुम्ही पेल्विक आणि कीगल भागातील मसल्स मजबूत करू शकता आणि शरीरातील या भागात मजबूती मिळाल्यावर तुम्ही अधिक चांगलं परफॉर्म करू शकता. चला जाणून तुमच्या लैंगिक जीवनात नवा उत्साह भरण्यासाठी कोणती आसनं करावीत.

नावासन किंवा बोट पोज

(Image Credit : Cinesign's Blog - WordPress.com)

हे आसन करताना तुमच्या शरीराचा आकार नावेच्या आकारात येतं. हे आसन करण्यासाठी तुमच्या पेल्विक(ओटीपोट)  भागातील मसल्स मजबूत होतात. या आसनात हिप आणि पोटावर दबाव पडून शरीराला मजबूती मिळते.

मर्जरी आसन किंवा कॅट पोज

(Image Credit : Ayurveda Yoga Courses)

या आसनाला कॅट पोजच्या नावाने देखील ओळखलं जातं. हे आसन केल्याने तुमच्या पेल्विक भागात ब्लडचं सर्कुलेशन वाढतं आणि यामुळे तुमच्या प्रायव्हेट पार्टला सुद्धा सपोर्ट मिळतो. हे तर तुम्हाला माहीत असेलच की, प्रायव्हेट पार्टच्या मसल्स मजबूत झाल्यावर तुमचा परफॉर्मन्सही सुधारतो.

उपविष्ठ कोणासन

(Image Credit : Yoga Basi)

हे आसन जेवढं बघायला कठीण वाटतं तेवढं नाहीये. हे आसन बसून पाय पसरून कंबर वाकण्याचं आसन आहे. हे आसन केल्याने तुमची हिप्स फ्लेक्सिबल होते. असं झाल्याने जेव्हा तुम्ही सेक्सची एखादी कठीण पोझिशन ट्राय करता तेव्हा तुम्हाला मजबूत हिप्सचा पूर्ण सपोर्ट मिळतो. तसेच या आसनामुळे प्रायव्हेट पार्टमध्ये ब्लड सर्कुलेशनही वाढतं.

भुजंगासन किंवा कोबरा पोज

(Image Credit : parenting.firstcry.com)

या आसनात कंबर आणि पाठ वाकवावी लागते. एक्सपर्ट सांगतात की, हे आसन केल्याने पुरूषांच्या पेल्विक भागाला मजबूत करण्यास मदत मिळते. असं झाल्यास तुमचा शारीरिक संबंधाचा कालावधीही वाढण्यास मदत मिळते.

हलासन किंवा प्लो पोज

(Image Credit : yoganada.siddhantait.com)

हे आसन करताना तुम्ही पूर्ण शरीर वाकवून मागच्या बाजूस घेऊन जाता. याने शरीर लवचिक होण्यास फार जास्त मदत होते. हे आसन नियमितपणे केल्यास शारीरिक संबंधावेळी कोणतीही पोजिशन तुम्ही सहजपणे करू शकाल. हे आसन केल्याने तुमच्या मेंदूतील ब्लड सर्कुलेशनही वाढतं.

पद्मासन किंवा लोटस पोज

(Image Credit : World Peace Yoga School)

एकतर हे आसन बघायला फारच सोपं वाटतं. पण सोपं नाहीये. तसेच फक्त पायांची घडी घालून बसल्याने लैंगिक क्षमतेत सुधारना कशी होईल अशा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. पण हेही तितकंच खरं आहे की, शांत आणि प्रसन्न मनाने शारीरिक संबंध ठेवण्यात जो आनंद मिळतो तो दुसरा कशातही मिळत नाही. पद्मासन केल्याने तुमचे हिप्स मजबूत होतात. सोबतच मेंदूही रिलॅक्स होतो. त्यामुळे या आसनाचा शारीरिक संबंधासाठी चांगला फायदा होतो.

(टिप : ही आसनं सोपी असली तरी आसनं जबरदस्तीने किंवा ओढून-ताणून करू नये. त्यामुळे ही आसने अभ्यास करूनच करावीत.)

Web Title: Yoga try these 5 aasan to improve your sex life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.